Siddhi Hande
सध्या सोशल मीडियावर नेहमी काही न काही ट्रेडिंगवर असते. मध्यंतरी अभिनेत्री गिरिजा ओक नॅशनल क्रश म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होत होती.
यानंतर आता अजून एका मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.ही अभिनेत्री आहे स्नेहलता वसईकर.
स्नेहलता वसईकरने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अनेकदा खलनायिकेच्या भूमिकांमध्ये दिसली.
स्नेहलता वसईकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने नुकतेच फोटो शेअर केले आहेत.
स्नेहलता वसईकरने आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
स्नेहलता वसईकरचे केस बॉब कट आहेत. त्यामुळे या लूकला वेगळाच टच मिळाला आहे.
स्नेहलताने एकदम सिंपल मेकअप केला आहे. हा मेकअप या लूकला साजेसा आहे.
स्नेहलता वसईकर यांनी स्वराज्यरक्षक संभाजी, पुण्यश्लोक अहिल्याबाई अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.