Sakshi Sunil Jadhav
मकर संक्रात हा सगळ्यांच्या आवडीचा आणि नव्या वर्षातला पहिला सण असतो. महिला या दिवशी सुंदर साड्या, हलव्याचे दागिने परिधान करतात. पण यंदा कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करु नयेत? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. पुढे आपण याची माहिती जाणून घेऊयात.
मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा, अर्घ्यदान आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व आहे.
या दिवशी विवाहित महिला साडी, बांगड्या, मंगळसूत्र, टिकली, गजरा घालून सजतात. मात्र साडीचा रंग चुकीचा असेल तर तो अशुभ मानला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे.
धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांत ज्या रंगाचे वस्त्रे परिधान करून येते, तो रंग सुवासिनींनी वापरू नये. यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून येत आहे, त्यामुळे महिलांनी पिवळा रंग टाळा.
फक्त पिवळ्या रंगाची साडीच नाही, तर पिवळ्या रंगाचे दागिने, बांगड्या, टिकली, पर्स किंवा अॅक्सेसरीजही वापरू नका, असं सांगितलं जातं.
सामान्यतः काळा रंग शुभ कार्यात वर्ज्य असतो. मात्र मकर संक्रांत हिवाळ्यात येते. म्हणून उष्णता शोषून घेणारा काळा रंग अनेक महिला परिधान करतात.
यंदा मकर संक्रांतीला केशरी, लाल आणि हिरवा रंग शुभ मानला जात आहे. सूर्याचे वर्ष असल्याने केशरी रंगाला विशेष महत्त्व आहे. लाल आणि हिरवा रंगही मंगलकार्यात वापरु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.