
नांदणी येथील महादेवी हत्तीला गुजरातच्या वनतारा अभयारण्यात हलवण्यात आलं
कोल्हापूरमधील नागरिकांनी हत्ती हलवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला
संतप्त जमावाने पोलीस व खासगी वाहनांची तोडफोड केली
स्वस्तिश्री जिनसेन मठाशी संबंधित असलेल्या हत्तीच्या स्थलांतरामुळे धार्मिक भावना भडकल्या
रणजित माजगावकर, साम प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर गुजरातकडे रवाना झाली. 'महादेवी' हत्तीणी गुजरातमधील वनतारा येथील अभयारण्यात राहणार आहे. त्यावरून कोल्हापूरमधील नागरीक संतापले असून त्यांनी पोलीस वाहनांची तोडफोड केलीय. हत्तीणीला घेऊन जात असताना काही नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सहा आणि खासगी दोन गाड्यांच्या काचा फोडल्या.
दरम्यान पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिलाय. महादेवीला वनतारात घेऊन जात असल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. संतापातून नागरिकांनी वाहनांची तोडफोड केली. तर काही नागरिकांनी थेट जिओ सीमवर बहिष्कार घातलाय. शिरोळ तालुक्यातील हजारो नागरिकांनी आपल्याकडील जिओ सीम कार्ड पोर्ट करण्यास सुरुवात केलीय.
दरम्यान जिओ सिम पोर्ट करताना एका नागरिकाना जिओ कंपनीच्या कर्मचाऱ्याशी फोनवर वाद घातलाय. त्याची क्लीप सध्या व्हायरल होतेय. परंतु या व्हायरल क्लीपबाबत साम टीव्ही पृष्टी करत नाही. आमचा हत्ती घेऊन जात आहे, त्यामुळे आम्ही कोणताच अंबानी यांच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरणार नाही असं एक ग्रामस्थ बोलत आहे.
हत्तीला घेऊन जाण्याच्या मिरवणुकीदरम्यान स्वप्निल इंगळे याने पोलिसांशी वाद घातला होता. "तुम्ही आम्हाला का आडवता? तुमच्याकडे काही लेखी आहे का?" असे विचारून, "हत्ती कसे घेऊन जाता ते बघतोच," असे म्हणत जमावाला चिथावणी दिली होती. या चिथावणीनंतर जमावातील १०० ते १२५ इसमांनी एकत्र येऊन पोलीस बंदोबस्तावर दगडफेक केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळली. त्यानंतर हत्तीणीला नांदणी पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. गावातील प्रमुख मार्गावरून ग्रामस्थांच्या उपस्थितीत हत्तीणीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. मात्र त्याचवेळी तोडफोडीची घटना घडली. नांदणी येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या महादेवी हत्तीण प्रकरण चर्चेत आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.