Jalgaon Grampanchayat Election Result Saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election Result: मुक्ताईनगर तालुक्यात खडसेंना धक्का; अमळनेरमध्ये मंत्री अनिल पाटलांचे वर्चस्व कायम

Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातील चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यात एकनाथ खडसेंचा (Eknath Khadse) बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात धक्का बसला आहे. तर अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील (Jalgaon) यांनी मात्र अमळनेर तालुक्यात आपले वर्चस्व कायम राखले आहे. (Latest Marathi News)

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तालुक्यातील बेलसवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या मंदाकिनी कोळी, वडवे ग्रामपंचायतवर शिंदे गटाचे शिवराम कोळी, चिखली ग्रामपंचायत वर शिंदे गटाचे वैभव पाटील सरपंचपदी विराजमान झाले. तर पिंपरी नांदू ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसे समर्थक प्रतिभा अशोक पाटील सरपंच पदी विराजमान झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमळनेर तालुक्यात १४ ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा झेंडा
अमळनेर (Amalner) तालुक्यात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे पाहायला मिळाले. अमळनेर तालुक्यातील १७ पैकी १४ ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा झेंडा फडकला असून दोन ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. तसेच शरद पवार गटाला मात्र एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान विजयानंतर मंत्री अनिल पाटील यांच्या समवेत विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetty : वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा; राजू शेट्टी यांची मागणी

RBI Governor Shaktikanta Das: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पुढच्या महिन्यात एसी लोकल धावणार, १२ फेऱ्या वाढणार

Pune Temple : पुण्यातील 'या' मंदिरात एकदा गेलात तर गाभाऱ्यातून पाय निघणार नाही

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT