Nana Patole Criticized BJP: भाजप हा खोटारडा पक्ष, खरा चेहरा समोर आला; नाना पटोलेंची टीका

Nana Patole : ग्रामपंचायतींच्या निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाने जास्त ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावला असल्याचं नाना पटोले म्हणालेत.
Nana Patole
Nana PatoleSaam Tv
Published On

Nana Patole Criticized BJP:

राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं. महायुती आणि महाविकास आघाडी अशी ही निवडणूक झाली. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसने महायुतीला जोरदार टक्कर दिली नसल्याचं दिसत आहे. परंतु या विधानाला महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विरोध दर्शवलाय. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजप हा खोटारडा पक्ष असून त्याचा चेहरा जनतेसमोर आल्याचा टोला नाना पटोले यांनी मारलाय. (Latest News)

राज्यात २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. यातील २ हजार २२० ग्रामपंचायतीच्या मतदानाची मोजणी करण्यात येत आहे. यात काँग्रेस पक्षाने ५८९ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे. तर १३२ ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक गटाने विजय मिळला आहे. यानुसार काँग्रेसने ७२१ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवलाय. तर महाविकास आघाडीच्या वतीने लढवण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ३२२ ठिकाणी विजय मिळालाय. त्यात अजून गोंदियातील ग्रामपंचायतीचा निकाल बाकी असल्याचं नाना पटोले म्हणालेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामीण भागात भाजपची स्थिती वाईट आहे. शेतकरीविरोधी धोरण, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई आदी प्रश्न ग्रामीण भागात जास्त जाणवतात असतात. त्याचाच परिमाण म्हणून भाजपाला फटका बसलाय. नागपूर हा भाजपचा गड आहे, तेथे त्यांचा सुपडा साफ झालाय. ज्या निवडणूकीत पक्ष नाही, पक्ष चिन्ह नाही त्या निवडणूकीतील विजयाचे दावे केले जात असल्याचा टोलाही पटोले यांनी मारलाय.

जर भाजपला एवढा आत्मविश्वास असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लावून दाखवाव्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चिन्हावर होत असतात. त्यामुळे या निवडणूका लावायला भाजप घाबरत असल्याचा टोमणा देखील नाना पटोले यांनी मारलाय.

Nana Patole
Grampanchayat Election Result: मुक्ताईनगर तालुक्यात खडसेंना धक्का; अमळनेरमध्ये मंत्री अनिल पाटलांचे वर्चस्व कायम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com