Grampanchayat Election Result 2023 : अजित पवार गट मजबूत होतेय; ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आमदार निलेश लंके यांचा दावा

Grampanchayat Election Nikal 2023 : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कुणाची सरशी? कोण मारणार बाजी मारणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.
Grampanchayat Result 2023
Grampanchayat Result 2023Saam tv
Published On

अजित पवार गट मजबूत होतेय; ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आमदार निलेश लंके दावा

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या ग्रामपंचायत पारनेर तालुक्यातील 7 ग्रामपंचायत पैकी निवडणुकीत निलेश लंके गट अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात 6 ग्रामपंचायत गेल्या आहेत. अजित पवार गटाचा दबदबा जिल्ह्यात देखील दिसून आले आहे. तालुक्यातील 45 ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा विजय झाला आहे.

याबाबत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी या विजयाचे श्रेय अजित पवार आणि मतदारांना दिले आहे. अजित पवारांनी विकास निधीच्या माध्यमातून मतदारसंघाला केलेल्या मदतीमुळेच लोकांनी आमच्या बाजूने कौल दिल्याचे निलेश लंके यांनी म्हंटले आहे

भंडाऱ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २८ उमेदवारांचा दणदणीत विजय

भंडारा जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायत निवडणुका झाल्या असून आज मतमोजणी सुरू आहे. मोहाडी तालुक्यात ५७ ग्रामपंचायत करीता मतमोजणीला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाने खाता उघडला आहे.

वर्धा तालुक्यातील नटाळा पुनर्वसन येथे भाजपने सत्ता राखली

वर्धा तालुक्याच्या नटाळा पुनर्वसन येथे भाजपने सत्ता राखली आहे. सरपंचपदी वर्षा डेहनकर विजयी झाल्या आहे तर पाच सदस्यही विजयी झालेत.

देवळी विधानसभा मतदारसंघात भाजपला भोपळा

दोन ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच तर दोघांवर अपक्षांची सत्ता. जिल्ह्यात आज ग्रामपंचायतची मतमोजणी संपली आहे. यात देवळी विधानसभा मतदार संघात भाजपला भोपळा मिळाला आहे. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून आमदार रणजित कांबळे यांनी हा गड पुन्हा राखला आहे.

अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात अजित पवार गटाचा करिष्मा

अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा करिष्मा पाहायला मिळाला. या ठिकाणी विद्यमान भाजप आमदार मोनिकाताई राजळे यांना चांगलाच धक्का बसला आहे. सर्वात जास्त ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या 27 जागांपैकी भाजपाला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.

तर अजित पवार गटाला बारा आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. तरी बऱ्यापैकी या ठिकाणी राष्ट्रवादीला मानणारे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे शेवगाव तालुका पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या मागे असल्याचं सिद्ध झालं आहे.

अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील 12 पैकी 3 ग्रामपंचायतीत विखे पाटलांनी सत्ता गमावली

अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील 12 पैकी 3 ग्रामपंचायतीत विखे पाटलांनी सत्ता गमावली. पुणतांबा, वाकडी आणि चितळी गावात भाजपच्याच कोल्हे गटाची सरशी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट

छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट

एकूण ग्रामपंचायत: 16

निकाल जाहीर: 16

भाजप: 04

शिंदे गट: 03

उद्धव ठाकरे गट: 1

अजित पवार गट: 03

शरद पवार गट:

काँग्रेस: 1

मनसे: 

इतर: 4

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का, मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघांमध्ये 17 पैकी 17 ग्रामपंचायतींवर विजय

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का, मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघांमध्ये 17 पैकी 17 ग्रामपंचायतींवर विजय

अहमदनगर : कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का

अहमदनगर : कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का, कर्जत जामखेड तालुक्यातील एकूण 9 पैकी भाजपकडे 5 जागा तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा, अजित पवार गटाकडे एक आणि स्थानिक आघाडीला एक जागा. भाजपाचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व कायम.

जळगाव - चाळीसगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा बोलबाला

जळगाव : चाळीसगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा बोलबाला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची विजयी घोडदौड. पहिल्या कलात 12 पैकी 11 जागांवर भाजपचे लोकनियुक्त सरपंच विजयी.

सांगली- शिराळा तालुक्यातील सावंतवाडी गावात मनसेची सत्ता

सांगली- शिराळा तालुक्यातील सावंतवाडी गावात मनसेची सत्ता. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सत्ता. शिराळा तालुक्यातील शिरसटवाडी ग्रामपंचायतीत सत्ता बदल. भाजपकडून राष्ट्रवादीकडे सत्ता. सरपंच पदासह सर्व जागावर विजय

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट

एकूण ग्रामपंचायत - 48

निकाल जाहीर - 20

भाजप - 03

शिंदे गट - 02

अजित पवार गट - 03

उद्धव ठाकरे गट - 03

काँग्रेस - 03

शरद पवार गट - 02

मनसे - 01

इतर - 03

बारामती तालुक्यातील सर्व 18 ग्रामपंचायत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे

बारामती तालुक्यातील एकूण 18 ग्रामपंचायतीचा निकाल हाती. सर्व 18 ग्रामपंचायत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे

भोंडवेवाडी

म्हसोबा नगर

पवई माळ

आंबी बुद्रुक

पानसरे वाडी

गाडीखेल

जराडवाडी

करंजे

कुतवळवाडी

दंडवाडी

मगरवाडी

निंबोडी

साबळेवाडी

उंडवडी कप

काळखैरेवाडी

चौधरवाडी

वंजारवाडी

चांदगुडेवाडी

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव. नारायणगाव ग्रामपंचयातमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली. 17 पैकी 16 उमेदवार विजय. सरपंच पद ठाकरे गटाकडे.

कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांना धक्का.

कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांना धक्का. कर्जत मतदारसंघातील निकाल जाहीर. कुंभेफळ आणि खेड गावात भाजपचा सरपंच तर आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांचा कर्मनवाडी येथे विजय.

भाजप आमदार संजय कुटेंना होम ग्राऊंडवर धक्का, जामोद ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

भाजप आमदार संजय कुटेंना होम ग्राऊंडवर धक्का, जामोद ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा. सरपंचपदी कॉंग्रेसच्या गंगुबाई दामधर. भाजपच्या उमेदवार अर्जना राऊत पराभूत. जामोद ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात शरद पवार गटाला मोठा धक्का, आतापर्यंत लागलेल्या निकालात १३ जागांवर अजित पवार गटाचे वर्चस्व

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात शरद पवार गटाला मोठा धक्का, सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाते वर्चस्व; आतापर्यंत लागलेल्या निकालात १३ जागांवर अजित पवार गटाचे वर्चस्व

सातारा,पाटण : जमदाडवाडी ग्रामपंचायत शंभुराज देसाई गट विजयी

सातारा, पाटण : जमदाडवाडी ग्रामपंचायतीत शंभुराज देसाई गट विजयी. कुसरुंग ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी गटाला धुळ चारत शंभुराज देसाई गट विजयी

ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट (सकाळी १०.५०)

ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट (सकाळी १०.५०)

भाजपा- १२८

शिवसेना(शिंदे)- ८१

राष्ट्रवादी (अजित पवार)- ९९

ऊबाठा- ४३

काँग्रेस- ५२

शरद पवार गट- ४१

अन्य- ५३

पुण्यातील खेडमध्ये भाजपला चांगलं यश, अजित पवार गटाचे वचर्स्व कायम

पुणे - खेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक सदस्य पदाचे निकाल समोर. १० ग्रामपंचायतींमध्ये ४५ सदस्य पदाचे निकाल जाहीर. भाजपला चांगलं यश, अजित पवार गटाचे वचर्स्व कायम.

अजित पवार गट- २५

भाजप - १०

ठाकरे गट - १

शिंदे गट - ९

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने खातं उघडलं

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने खातं उघडलं. जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द ग्रामपंचायतीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी

ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट (सकाळी १०.१५ वाजेपर्यंत )

ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट (सकाळी १०.१५)

एकूण संख्या- २३५९

विजयी/घोषित

भाजपा- १०३

शिवसेना (शिंदे) - ६७

राष्ट्रवादी(अजित पवार) - ८७

ऊबाठा- ३०

काँग्रेस- ३८

शरद पवार गट- ३२

अन्य- ४२

पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने खातं उघडलं

पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने खातं उघडलं. पालघरमधील उच्छेळी आणि उनभाट ग्रामपंचायतींवर उद्धव ठाकरेंची मशाल . दोन्ही ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सरपंच विजय.

बारामतीत अजित'दादा'च; सुरुवातीच्या ५ ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाची सरशी

बारामतीमध्ये ५ ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाची सरशी. पानसरे वाडी धरून ५ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी. बारामतीमध्ये आमबी बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी येथे अजित पवार गटाची सत्ता.

पंढरपूरच्या ईश्वर वठार ग्रामपंचायतीमध्ये 30 वर्षांनंतर सत्तांतर

पंढरपूरच्या ईश्वर वठार ग्रामपंचायतीमध्ये 30 वर्षांनंतर सत्तांतर. भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने गटाला धक्का.स्थानिक आघाडीचे नारायण देशमुख गटाची सत्ता.

बारामती : अजित पवार गटाचा चौथा विजय. भोंडवे वाडी, म्हसोबा नगर, पवई माळ, आमबी बुद्रुकसुद्धा अजित पवार गट विजयी.

बारामती : अजित पवार गटाचा चौथा विजय. भोंडवे वाडी, म्हसोबा नगर, पवई माळ, आमबी बुद्रुकसुद्धा अजित पवार गट विजयी.

सांगोल्यात शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठा धक्का

सांगोल्यात शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठा धक्का, खवासपूर ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे संजय दिक्षीत विजयी

कोल्हापूरमधील आतापर्यंतचे निकाल

भाजप – 2

शिंदे गट – 6

ठाकरे गट – 1

अजित पवार गट –5

शरद पवार गट – 0

काँग्रेस – 4

इतर - 7

बारामती तालुक्यातून पहिला निकाल जाहीर

बारामती तालुक्यातून पहिला निकाल जाहीर. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा भोंडवेवाडीमधून विजय, एकच वादा अजितदादा घोषणा, श्री बिरोबा जनसेवा पॅनल विजयी

ग्रामपंचायत निवडणूक निकालात आतापर्यंत अजित पवार गट आघाडीवर, भाजप दुसऱ्या स्थानावर

ग्रामपंचायत निवडणूक निकालात आतापर्यंत अजित पवार गट आघाडीवर, भाजप दुसऱ्या स्थानावर

कोल्हापूरमध्ये  आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांना धक्का

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिंचवाड ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी एकत्रित ही निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही गटामधून नाराज होऊन बाहेर पडलेल्या तिन्ही अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत बाजी मारलेली आहे.

कोल्हापूर : राधानगरी- फराळे लोकनियुक्त सरपंचपद सतेज पाटील गटाकडे

कोल्हापूर : राधानगरी- फराळे लोकनियुक्त सरपंचपद सतेज पाटील गटाकडे. सीमा संदीप डवर विजयी. मांगेवाडी लोकनियुक्त सरपंच प्रवीण नामदेव ढवण.

सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात. भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचं पॅनल विजयी. काँग्रेस आमदार प्रणिती पॅनलचा धुव्वा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com