Sakshi Sunil Jadhav
उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांची गरज जास्त जाणवते. अशा वेळी नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे (Ice Apple) आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.
ताडगोळ्यांचा गुणधर्म थंड असल्यामुळे ते शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात शरीराला आराम मिळतो.
ताडगोळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.
ताडगोळे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन, अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ होण्यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका वाढतो. ताडगोळे खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
ताडगोळ्यातील पोषक घटक त्वचेला हायड्रेट ठेवतात. त्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि निरोगी दिसण्यास मदत होते.
उन्हामुळे शरीर पटकन थकते. ताडगोळे खाल्ल्याने शरीराला ताजेपणा मिळतो आणि थकवा कमी होतो.
ताडगोळे कमी कॅलरीचे असल्यामुळे ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.
ताडगोळे शरीरातील उष्णता कमी करून लघवी करताना होणारी जळजळ किंवा त्रास कमी करण्यास मदत करतात.
ताडगोळ्यात काही आवश्यक खनिजे आणि पोषक घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.