Grampanchayat Election Results 2023 : काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांत राडा, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर क-हाडात तणाव

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर कराड शहरात उमेदवारांची विजयी मिरवणुक काढण्यात आली.
Grampanchayat Election Results 2023 :
Grampanchayat Election Results 2023 :saam tv
Published On

Karad News : ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी झाल्यानंतर कराड (Karad Taluka Grampanchayat Election Results 2023) शहरातील शाहू चौकात काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची जोरदार मारामारी झाली. या घटनेनंतर पाेलीसांनी दाेन्ही गटातील कार्यकर्त्यांची शाेधा शाेध सुरु केली आहे. (Maharashtra News)

कराड तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीची मतमोजणी नुकतीच संपली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 8 जागांवर राष्ट्रीय काँग्रेस 3 जागांवर तसेच भाजपने 1 जागेवर विजय मिळविला आहे. या निकालानंतर विजय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. अनेकांनी त्यांच्या गावात देखील गुलालाची उधळण करीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

Grampanchayat Election Results 2023 :
Nitesh Rane On Grampanchayat Election Results : काेकणात भाजपच, अजित पवारांच्या करिष्म्यावर नितेश राणेंकडून काैतुक (पाहा व्हिडिओ)

कराड तहसिल कार्यालयासमोर गुलाल उधळण्यास मज्जाव केल्याने पोलीस आणि टेंभू गावच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी पाेलीसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरु केली. त्यानंतर कार्यकर्ते नरमले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत रेठरे बुद्रुकच्या विजयी उमेदवारांनी कराड शहरातून मिरवणुक काढली. या मिरवणुकीत शाहू चौकात काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची जोरदार मारामारी झाली.

Grampanchayat Election Results 2023 :
Maharashtra Politics : शंभूराज देसाई वेळ तारीख सांगा : सुषमा अंधारेंचे प्रतिआव्हान (पाहा व्हिडिओ)

ग्रामपंचायतीवर सत्ता

रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत भाजप (भाजपाचे अतुल भोसले यांचे पॅनेल विजयी)

सरपंच पदासह पॅनेल विजयी

कॉग्रेससह महाविकास आघाडीच्या एकत्रीत पॅनेलचा पराभव.

टेंभू ग्रामपंचायत शरद पवार गटाकडे (आमदार बाळासाहेब पाटील यांना सत्ता राखण्यात यश)

येणपे ग्रामपंचायतीच्या बाराही कॉग्रेसकडे.

मनीषा प्रताप शेटे (सरपंच)

हेळगाव ग्रामपंचायत शरद पवार गटाकडे

हेळगाव ग्रामपंचायतीच्या 10 पैकी 9 जागा आमदार बाळासाहेब पाटील गटाच्या सह्याद्रि ग्रामविकास पैनलकड़े. विरोधी हेळगाव विकास आघाडीला फ़क्त 1 जागा

सरपंचपदी मिलिंद कृष्णा पाटील यांची निवड.

Edited By : Siddharth Latkar

Grampanchayat Election Results 2023 :
Diwali 2023 : नंदुरबारातील अष्टलक्ष्मीच्या मूर्तींना गुजरात, मध्यप्रदेशातून माेठी मागणी, कारगिरांची दिवाळी तेजीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com