Diwali 2023 : नंदुरबारातील अष्टलक्ष्मीच्या मूर्तींना गुजरात, मध्यप्रदेशातून माेठी मागणी, कारगिरांची दिवाळी तेजीत

बाहेरील राज्यात पाठवण्यात येणाऱ्या मूर्ती तयार झाल्या आहेत.
laxmi idol
laxmi idolsaam tv
Published On

- सागर निकवडे

Laxmi Pujan Diwali 2023 : दिवाळी निमित्त नंदुरबार शहरात मूर्तिकारांची लक्ष्मीची मूर्ती बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. कलाकार चार इंचापासून एका फुटापर्यंतची लक्ष्मीची मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. विविध रूपातील आणि विविध आकारातील अष्टलक्ष्मी मुर्त्यांना गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे कलाकारांनी नमूद केले. (Maharashtra News)

laxmi idol
Maharashtra Politics : शंभूराज देसाई वेळ तारीख सांगा : सुषमा अंधारेंचे प्रतिआव्हान (पाहा व्हिडिओ)

नंदुरबार त्याचप्रमाणे शेजारील गुजरात आणि मध्यप्रदेश मधून मोठ्या प्रमाणात मुर्तींसाठींचे बुकिंग झाली आहे. गुजरात राज्यात अष्टलक्ष्मीच्या मुर्त्यांना मोठी मागणी असून 51 रुपयांपासून तर पंधराशे रुपये पर्यंतच्या लक्ष्मीच्या मुर्त्या विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

दिवाळीला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना कारखान्यांमध्ये लगबग वाढली आहे. नंदुरबार शहरातल्या जवळपास 40 ते 50 कारखान्यांमधून शेकडो कारागीर मुर्त्या साकारताना दिसून येत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाहेरील राज्यात पाठवण्यात येणाऱ्या मुर्त्या पूर्ण झाल्या असून त्यांना गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात विक्रीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कारखानदारांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

laxmi idol
Sanjay Raut : संजय राऊत हाजीर हाे ! मालेगाव काेर्टानं बजावलं वाॅरंट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com