Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टर काय म्हणाले?

Eknath Khadse News: डॉक्टरांनी पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ खडसेंच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
Eknath Khadse Health Update
Eknath Khadse Health UpdateSaam tv
Published On

संजय महाजन, प्रतिनिधी

Eknath Khadse Health update:

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. सध्या त्यांच्यावर जळगावमध्ये प्राथमिक उपचार सुरू असून सायंकाळी त्यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्यात येणार आहे. एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून डॉक्टरांनी पत्रकारांशी संवाद साधताना खडसेंच्या आरोग्याची माहिती दिली आहे.

काय म्हणाले डॉक्टर?

आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जळगावमधील (Jalgaon) गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. खडसे यांच्या छातीत गेल्या दोन दिवसांपासून बर्निंग सेंच्युरीनचा त्रास जाणवत होता. त्यामुळे ते रुटिंग चेकअपसाठी आल्याचे डॉक्टर विवेक चौधरी यांनी सांगितले.

तसेच "सध्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांचा रक्तदाब स्थिर आहे, रक्तातील शुगर स्थिर आहे. छातीत थोडा त्रास जाणवत असल्याने त्यांना पुढील उपचाराची गरज आहे. त्यांची ॲंन्जिओग्राफी करावी लागणार आहे, त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवण्यात येईल," असेही डॉक्टरांनी सांगितले. तसेच उपचारानंतर त्यांनी आमच्याशी गप्पाही मारल्याचे डॉक्टर चौधरी म्हणाले.

Eknath Khadse Health Update
Sita Mata Temple: सीतेवरून रामायण घडलं; मात्र देशात सीतामातेचं मंदिर कुठे आहे? वाचा सविस्तर

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांनी खडसेंना मुंबईला हलवण्यासाठी एयर ॲम्बुलन्सची व्यवस्था केली असून सायंकाळी त्यांना मुंबईकडे हलवण्यात येईल. (Latest Marathi News)

Eknath Khadse Health Update
Amravati Crime: घरगुती वादातुन पत्नीवर जीवघेणा हल्ला; घटनेनंतर पती स्वतः गेला पोलिसात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com