Sita Mata Temple: सीतेवरून रामायण घडलं; मात्र देशात सीतामातेचं मंदिर कुठे आहे? वाचा सविस्तर

Yavatmal News: त्रेतायुगात माता सीता वनवासात असताना दंडकारण्यांतील रामगंगा नदीच्या तीरावर असलेल्या वाल्मीक ॠषीच्या आश्रमात आश्रायला राहिलेल्या पवित्र ठिकाणी प्राचीन मंदिरात सीतामातेची मूर्ती विराजमान आहे.
Sita Mata Temple
Sita Mata TempleSaam TV
Published On

संजय राठोड, यवतमाळ

Sita Mata Temple:

यवतमाळच्या राळेगाव शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरी या गावात भारतातील एकमेव सीतामाता मंदिर आहे. या ठिकाणी सीता मातेची नव्याने मूर्ती स्थापना करण्यात आलीये. त्रेतायुगात माता सीता वनवासात असताना दंडकारण्यांतील रामगंगा नदीच्या तीरावर असलेल्या वाल्मीक ॠषीच्या आश्रमात आश्रायला राहिलेल्या पवित्र ठिकाणी प्राचीन मंदिरात सीतामातेची मूर्ती विराजमान आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sita Mata Temple
Lonar Dhareshwar Temple : गायमुख कुंड भाविकांसाठी खूला करा : लाेणारवासिय आक्रमक (पाहा व्हिडिओ)

परंतु मुघल साम्राज्यात हिंदू देवी देवतांच्या मंदिरावर झालेल्या आक्रमणात मूर्तीचे काही प्रमाणात नुकसान झाले. म्हणून भक्तगणांनी मूर्तीची परत एकदा स्थापना करण्याचे ठरविले. मनसेचे नेते राजू उंबरकर तृप्ती उंबरकर या दाम्पत्याने सीता मातेच्या मूर्तीची स्थापाना केली. रावेरी या गावातून उत्तर वाहिनी रामगंगा नदीच्या तीरावर वाल्मीक ॠषींच्या आश्रमात लवकुशांचा जन्म झाल्याची अध्यायिका भाविकांची आहे.

रावेरी गावातील पुर्वजांपासून वयोवृद्ध मंडळी याबद्दल अशी आख्यायिका सांगतात की,जेव्हा रामाने सीतेला गरोदर अवस्थेत वनवासात सोडून दिले तेव्हा सीतेचे याच रावेरी गावात वाल्मीक ऋषींच्या आश्रयाने वास्तव केले. हे गाव आणि परिसर हा दंडाकारण्यात भाग असून याच गावात लव-कुशाचा जन्म झाला.

लव-कुशाचा जन्म झाल्यानंतर सीतेने गावातील लोकांकडे पसाभर गहू मागितले. गहू देण्यास लोकांनी नाकार दिल्यावर तिने गावकऱ्यांना शाप दिला की,या गावात गहू पिकणार नाही. शापाप्रमाणे या गावात गहू पिकत नव्हता. परंतु काही वर्षानंतर गावातील लोकांनी सीतेला साकडे घालून पिकलेला गहू सीता मंदिरात भेट दिल्याशिवाय आम्ही गव्हाचा एकही दाणा खाणार नाही, असा संकल्प करून तो संकल्प वार्षिक पाळल्यामुळे गावात गहू पिकण्यास सुरुवात झाली.

आणखी एक कहाणी आहे की, रामाचा अश्वमेध यज्ञाचा घोडा लव कुशांनी आडवीला आणि त्या घोड्याबरोबर आलेल्या शत्रुघन, लक्ष्मण यांचा पराभव करून घोड्याबरोबर आलेला हनुमानाला वेलीने बांधून ठेवले. रावेरी गावात वेलीने बांधलेल्या स्थितीत नऊ फूट उंचीची हनुमानाची भव्य मूर्ती आहे. ज्या ठिकाणी लव-कुशांनी अश्वमेध घोडा पकडला ते ठिकाण तमसा नदीच्या (रामगंगा) तीरावर आजही पाहण्यास मिळते.

गावाच्या दक्षिण भागाकडून तमसा रामगंगा नदीचे वळण असून उत्तर वाहिनी असलेल्या नदीच्या तीरावर युगातील एकमेव वनवासी सीतेचे हेमाडपंथी मंदिर आहे. तसेच बाजूला वाल्मीक ऋषीचे आश्रम सुद्धा आहे शिवाजी महाराजांच्या कला खंडातील पाच मोठे बुरुज गडी व त्याला भिंतीचा असलेला परकोट आजही पहायला मिळतो.

Sita Mata Temple
Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची हत्या; पक्षाचा प्रचार करून परतताना नक्षलवाद्यांनी केली निर्घृण हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com