Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी संघटित झालाे तर तुम्हांला परवडणार नाही : अर्जुन खोतकर

जायकवाडीच्या पाण्यासाठी आमदार राजेश टाेपे यांच्यापाठाेपाठ अर्जुन खाेतकर देखील आक्रमक झालेत.
Eknath Shinde Arjun Khotkar Latest Update
Eknath Shinde Arjun Khotkar Latest UpdateSAAM TV
Published On

Jalna News : हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करायला लावू नका असा इशारा शिवसेना नेते अजुर्न खाेतकर (shivsena leader arjun khotkar reaction on jayakwadi dam water issue) यांनी सरकारला दिला. नऊ दिवस झाले तरी अद्याप जायकवाडी धरणात पाणी न साेडल्याने मराठवाड्यातील नेते आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळत आहे. आमदार राजेश टाेपे (rajesh tope) यांच्यापाठाेपाठ आता खाेतकरांनी देखील पाण्यासाठी आवाज उठविला आहे. (Maharashtra News)

Eknath Shinde Arjun Khotkar Latest Update
Talegoan MIDC : दिवस 33 वा... सरकारच्या विराेधात जनरल मोटर्सच्या कामगारांचे मुंडन आंदाेलन

शिवसेना नेते अर्जुन खोतकर म्हणाले जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्याशी चर्चा करणार आहे. काही वेळापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ताे झाला नाही असेही खाेतकरांनी नमूद केले.

ते म्हणाले मराठवाड्यात यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं जायकवाडीत हक्काचं पाणी सोडण्यात यावं असे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं दिले आहेत.

जायकवाडीच्या पाण्याचा छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील शेतक-यांना हाेऊ शकताे. परंतु आदेशाला न जुमानता जायकवाडीत पाणी सोडलं जात नाही अशी खंत खाेतकरांनी व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम्हांला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करायला लावू नका असा इशाराही खोतकर यांनी सरकारला दिला. मुख्यमंत्र्यांशी पाण्यासाठी चर्चा केली जाईल. ते सकारात्मक निर्णय देतील असा विश्वासही खाेतकरांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

Eknath Shinde Arjun Khotkar Latest Update
Vanchit Yuva Aghadi : अकाेला कृषी विभागास 'वंचित'च्या पदाधिका-याची मंगळवारपर्यंतची डेडलाईन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com