Delhi Pollution:  दिल्लीकरांना लोकांना श्वास घेणं झालं कठीण, पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी
Saam ANI

Delhi Pollution: दिल्लीकरांना लोकांना श्वास घेणं झालं कठीण, पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी

Delhi Pollution: मागील काही दिवसांपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूप खराब झालीय.
Published on

Delhi Pollution:

मुंबई, दिल्ली आणि चेन्नई या महानगरांमध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. या प्रदूषणामुळे आरोग्यास धोका निर्माण झालाय. राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या प्रदूषणामुळे दिल्ली सरकारने प्राथमिक खासगी आणि सरकारी शाळांना बंद ठेवण्याचा आदेश दिलाय. यासह इयत्ता ६ ते १२ वी पर्यंतच्या शाळांना ऑनलाईन क्लासचा पर्याय देण्यात आलाय.(Latest News)

म्हणजेच ह्या शाळा ऑनलाईन क्लास घेऊन शाळा सुरू ठेवू शकतात किंवा बंद ठेवू शकतात. राज्य सरकारने दिलेला हा आदेश १० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूप खराब झालीय. शिक्षण मंत्री आतिशी यांनी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म एक्सवर (आधीचे ट्विटर) हा आदेश दिलाय. आतिशी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, प्रदूषणाची स्तर जास्त असल्यामुळे दिल्लीमधील प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद असतील. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर सहावी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करण्याचा पर्याय देण्यात आलाय. मागील दोन आठवड्यात दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिल्लीची एअर क्लालिटी इंडेक्समध्ये ४१० वर पोहोचलाय. शनिवारी संपूर्ण शहरात धुकं पसरलं होतं, आजही तीच परिस्थिती होती.

दिल्लीच्या विविध भागात प्रदूषणाची पातळी ही ४०० ते ५०० पर्यंत नोंदवण्यात आली होती. दिल्ली आणि परिसरातील लोकांना श्वास घेणं कठीण झालंय. अनेक ठिकाणी अँटी स्मॉग गनचा वापर करूनही प्रदूषणात कोणतीही घट झालेली नाही. यासह पंजाबच्या अनेक भागात गव्हाच्या पिकाचा कुटार (पराली) जाळण्यात आल्याने राजधानी दिल्लीची हवा खराब झालीय.

शनिवारी हवामान विभागाने दिलेल्या आकड्यानुसार, दिल्लीमध्ये ३५ टक्के प्रदूषण हे गव्हाचं कुटार (पराली) जाळल्यामुळे होत आहे. ग्रेडेड रिस्पांस एक्शन प्लान स्तर ३ला दिल्लीमध्ये लागू करण्यात आलंय. यामुळे दिल्लीमध्ये इतर राज्यातील बसेसला प्रवेश नाकारण्यात येत आहे.

Delhi Pollution:  दिल्लीकरांना लोकांना श्वास घेणं झालं कठीण, पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी
Earthquake India Nepal: नेपाळनंतर भारतात मोठा भूकंप येण्याची शक्यता, कोणत्या राज्याला असेल सर्वाधिक धोका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com