दिल्ली - एनसीआरमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली.
रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. तीव्र धक्क्यांनी दिल्ली-एनसीआरपर्यंत जोरदार हादरे बसले. येथील नागरिक भीतीपोटी घरातून बाहेर निघाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
दिल्ली-एनसीआरपर्यंत ६० सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते, असे काही नागरिकांनी सांगितले. याआधी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नेपाळमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली -एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात हादरला. दिल्ली एनसीआरमध्ये रहिवासी गोंधळून गेले. रात्रीच काही नागरिक घराबाहेर निघाले होते.
अचानक हादरे बसू लागल्याने लोक भीतीने घराबाहेर पडू लागले. रात्री साडेअकराच्या सुमारास धक्के जाणवू लागले. नेमकं काय होतंय, हेच कळेनासे झाले होते. अनेकांनी आपल्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना फोन करून त्यांच्याकडे विचारणा केली. भूकंपांनंतर काही वेळाने पुन्हा हादरे बसू शकतात. त्यामुळे अनेक नागरिक बराच वेळ रस्त्यावर उभे होते.
दिल्लीतील एका महिलेने एएनआयला सांगितले की, भूकंपाचे तीव्र धक्के जाणवू लागल्यानंतर पुढची दहा मिनिटे काहीच सूचत नव्हते. नेमकं काय झालं आहे, याचाच विचार करण्यात दहा मिनिटे गेली.
बिहारमधील अरुण कुमार यांनीही प्रतिक्रिया दिली. झोपी गेलो होतो. अचानक घरातील वस्तू जोरजोरात हलायला लागल्या. भूकंप असावा असं त्याचवेळी वाटलं, असं त्यांनी सांगितलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.