Delhi-NCR Air Pollution: दिल्लीच्या रस्त्यांवर वाहनांना बंदी, २० हजारांचा भरावा लागणार दंड

Delhi-NCR Air Pollution: दिल्ली एनसीआर परिसरातील नागरिकांना सकाळपासून श्वासाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गुरुवारी हवेतील विषारी धुळीच्या कणांनी धोकादायक पातळी ओलांडली
Delhi-NCR Air Pollution
Delhi-NCR Air PollutionSaam Digital
Published On

Delhi-NCR Air Pollution

दिल्ली एनसीआर परिसरातील नागरिकांना सकाळपासून श्वासाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गुरुवारी हवेतील विषारी धुळीच्या कणांनी धोकादायक पातळी ओलांडली. तर दिल्लीत रात्रीच्यावेळी हवेचा स्तर ८०० पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे श्रेणीबद्ध प्रतिसाद योजना स्टेज -३ लागू करण्यात येत असून पाचवी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

वाढत्या हवा प्रदूषणाच्या चिंत्तेमुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने कन्स्ट्रक्शन, दगड फोडण्याची कामे, उत्खननावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली गुरुग्राम , फरीदाबाद, गाजियाबाद आणि गौतमबुद्धनगर मध्ये बीएस -३ बीएस -४ च्या डिझेलवर चालणाऱ्या वाहणांना बंदी घालण्यात आली आहे. जर अशी वाहने रस्त्यावर दिसली तर मोठा दंड भरावा लागणार आहे. दिल्ली परिवहन विभागाने बीएस -३ बीएस -४ डिझेलच्या वाहनांना २० रजार रुपयांचा दंड आकारण्याचा आदेशच काढला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi-NCR Air Pollution
Rajasthan Politics, ED: राजस्थानात २५ ठिकाणी ED चे छापे; नेते, अधिकारीही रडारवर?

दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत श्रेणीबद्ध प्रतिसाद योजना स्टेज -३ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अंतर्गत अनेक कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. दररोज रस्त्यांची सफाई करण्यासह पाण्याची फवारणी करण्यात आली आहे. दिल्ली एनसीआर मध्ये बांधकाम आणि त्यासंबंधीत काम थांबवण्यात आले आहे.

Delhi-NCR Air Pollution
Indian Politics: 'INDIA' आघाडीत बिघाडी? नितीश कुमार यांचा काँग्रेसवर घणाघात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com