Pollution Side Effects : दिल्ली- मुंबईकरांचा श्वास गुदमरला, वाढत्या प्रदूषणामुळे मधुमेह-हृदयविकाराचा धोका; कशी घ्याल काळजी

Mumbai Pollution : प्रदूषणाचा वाढता विळखा पाहाता मुंबईकरांचा श्वास कोंडल्याचे पाहायला मिळाले.
Pollution Side Effects
Pollution Side EffectsSaam Tv
Published On

Diabetes Heart Issue :

वाढत्या प्रदूषणासोबतच शहरीकरणसुद्धा वाढले आहे. ऑक्टोबर हिटचा मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अशातच मुंबईतील काही भागात गारवा जाणवतोय तर काही भागात प्रदूषण जाणवत आहे.

मुंबईच्या हवेतील गुणवत्तेचा दर्जा घसरल्यामुळे पुन्हा एकदा हवामान विभागाने काही भागातील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे नोंदवले. प्रदूषणाचा वाढता विळखा पाहाता मुंबईकरांचा श्वास कोंडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा वाढतो आहे असे एका अहवालातून समोर आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रदूषणात असणारे घटक टाइप २ मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढतोय असे संशोधनातून समोर आले आहे. दिल्ली आणि दक्षिण चेन्नईमध्ये केलेल्या अभ्यासानुसार प्रदूषणामुळे हवेत पीएम २.५ कण वाढतात. त्यामुळे श्वास घेण्यासह रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण वाढते आहे. तसेच दीर्घकाळपर्यंत लोकांना टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो आहे.

Pollution Side Effects
Food For Diabetes : हिवाळ्यात वाढू शकतो मधुमेहाचा त्रास, हे सुपरफूड खा; ब्लड शुगर राहिल नियंत्रणात

प्रदूषणात असणारे पीएम घटक हे केसांपेक्षा ३० पट अधिक पातळ असतात. जे शरीरात गेल्यावर हृदयविकार आणि श्वसनाच्या समस्याचा त्रास उद्भवतो आहे. प्रदूषणामुळे मधुमेह-हृदयविकारासोबत उच्च रक्तदाबाची संख्या देखील वाढताना दिसून येत आहे.

देशभरात सुमारे ११ टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. याशिवाय १३ कोटींहून अधिक लोक मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत. जूनमध्ये प्रकाशित झालेल्या लॅन्सेट अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, हा आकडा युरोपपेक्षा अधिक जास्त आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक असल्याचे आढळून आले आहे. अशावेळी नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.

Pollution Side Effects
Air Pollution Side Effects : वाढत्या प्रदूषणाचा फुफ्फुसावर होतोय परिणाम, डाएटमध्ये आजच सामील करा हे ड्रिंक्स
  • ज्या लोकांना श्वास (Breath) घेण्यास त्रास होत असेल त्यांना धुळीपासून स्वत:चे रक्षण करायला हवे. तसेच मास्कचा वापर करा, वारंवार त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • हवेच्या प्रदूषणामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांतून पाणी येणे, डोळे चुरचुरणे आणि जळजळणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

  • हवेच्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते. त्यामुळे सतत खोकल्याचा त्रास होऊन छातीत इन्फेक्शन होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com