Diabetes In Children: चिमुकल्यांमध्ये ही लक्षणे दिसल्यास असू शकतो मधुमेहाचा आजार, दुर्लक्ष करु नका; वेळीच घ्या काळजी

Symptoms of diabetes in children: खराब जीवनशैली, खाण्याच्या सवयी, लठ्ठपणा, अतिरिक्त ताण किंवा आनुवंशिकता यांसारख्या गोष्टींमुळे मधुमेहाचा आजार जडतो.
Diabetes In Children
Diabetes In ChildrenSaam tv
Published On

Signs of Diabetes in Kids :

भारतातील ९० टक्के रुग्ण हे मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यात प्रामुख्याने लहान मुलांचा देखील समावेश आढळून आला आहे. मधुमेहाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो.

खराब जीवनशैली, खाण्याच्या सवयी, लठ्ठपणा, अतिरिक्त ताण किंवा आनुवंशिकता यांसारख्या गोष्टींमुळे मधुमेहाचा आजार जडतो. घरात जर हा आजार कोणत्याही व्यक्तीला असेल तर याचा सामना इतरांना देखील करावा लागतो. आजकाल या आजाराचे शिकार लहान मुले अधिक प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. जर तुम्हालाही मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

1. अचानक वजन कमी होणे

वाढत्या वयात मुलांना अधिक भूक लागून देखील त्याचे वजन वाढत नसेल तर काळजी घ्यायला हवी. तसेच मुलांचे अचानक वजन कमी झाले तर डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्या कारण अचानक वजन कमी होणे मधुमेहाचे लक्षण असू शकते.

2. वारंवार मूत्रविसर्जन

लहान मुले जर नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी करत असेल तर मधुमेहाचे (Diabetes) लक्षण असू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी.

Diabetes In Children
Konkan Famous Fort In Sea face: कोकणातला 'अंजिक्य किल्ला' आहे समुद्रात, येथील विलोभनीय दृश्य तरुणाईला घालते भुरळ

3. खूप तहान लागणे

अनेक वेळा मुल न खेळता किंवा घाम न गाळता जास्त पाणी पिऊ लागते. हे देखील मधुमेहाचे कारण असू शकते. रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण जास्त असल्याने तहान जास्त लागते.

4. जास्त भूक लागणे

शरीरात रक्तातील साखर वाढली तर मुलांना जास्त भूक लागते. खाल्ल्यानंतरही भूक लागल्याची तक्रार जर मुल करत असतील तर मधुमेहाचा त्रास असण्याची शक्यता असू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com