कोमल दामुद्रे
कोकण हे निसर्ग सौंदर्यांने बहरलेलं ठिकाण आहे. येथे नेहमीच हिरवाई पसरलेली दिसते.
कोकणातील असा एक किल्ला जो अंजिक्य किल्ला म्हणून ओळखला जातो.
अलिबागपासून ४८ किलोमीटरवरील मुरुड-जंजिरा किल्ला अभेद्यतेमुळे इतिहासात ठसा उमटवून आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्यातील जलदुर्ग असलेला मुरुडचा जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.
जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट आणि मेहरुब म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घरलेले आहे.
मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत.
भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत.
शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.
डाव्या बाजूला निसर्गरम्य मुरुड अन् उजव्या बाजूला समुद्राची गाज असे भारावून टाकणारे वातावरण आहे.
खवळलेला समुद्र, भक्कम तटबंदी आणि बुलंदी तोफा यामुळेच किल्ला अजिंक्य असा हा किल्ला