Bad Breath In Kids : कितीही महागडा टूथपेस्ट वापरला तरी चिमुकल्यांच्या तोंडाची दुर्गंधी येते? चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

Reasons Of Bad Breath : मौखिक आरोग्य हे प्रत्येक वयोगटातील लोकांचे चांगले असले की, कोणताही आजार आपल्याला होऊ शकत नाही असे म्हटले जाते.
Bad Breath In Kids
Bad Breath In Kids Saam tv
Published On

Causes Of Bad Breath In Kids : श्वासाची दुर्गंधी ही आरोग्याची अत्यंत वाईट व गंभीर समस्या. दिवसभरात आपण जे काही खातो ते आपल्या तोंडामार्फत. अनेकदा हे पदार्थ आपल्याला दातात अडकतात त्यामुळे आपल्याला तोंडाला दुर्गंधी येऊ लागते.

मौखिक आरोग्य हे प्रत्येक वयोगटातील लोकांचे चांगले असले की, कोणताही आजार आपल्याला होऊ शकत नाही असे म्हटले जाते. तोंडाची दुर्गंधी का येते याबाबत अनेकांना माहीत नाही. कधीकधी ही दुर्गंधी मुलांच्या तोंडातून येऊ लागते. यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्या पदार्थांचे मुलं सेवन करतात त्यामुळे त्यांच्या तोंडात बॅक्टेरिया निर्माण होतात. यासाठी ब्रश करुन या समस्येवर मात करता येते. पण तरीही तोंडाची दुर्गंधी येत असेल तर पालकांनी वेळीच काळजी घ्यायला हवी.

Bad Breath In Kids
Hair Falls Problem: झरझर वाढतीलच! केस प्रमाणापेक्षा जास्त गळताय? फुलांपासून बनवा आयुर्वेदिक होममेड तेल, लगेच मिळेल रिजल्ट

1. ड्राय माउथ

ड्राय माउथ हे मुलांमध्ये (Kids) दुर्गंधी येण्याचे एक कारण असू शकते. जेव्हा मुलाच्या तोंडातील लाळ कमी होते तेव्हा तोंड कोरडे होते, ज्यामुळे बॅक्टेरिया शरीरात दीर्घकाळ राहतात. त्यामुळे मुलांच्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. याशिवाय जर मुलाला तोंडात बोट घालण्याची सवय असेल किंवा बोट चोखण्याची सवय असेल तर त्यामुळेही तोंड कोरडे पडते. काही वेळा आरोग्याशी संबंधित औषधे घेतल्याने मुलाचे तोंड कोरडे होते.

2. मौखिक आरोग्य

अनेक वेळा तोंडाची स्वच्छता न पाळल्यामुळे मुलांच्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. जेव्हा मूल तोंड आणि दात व्यवस्थित स्वच्छ करत नाही तेव्हा श्वासाची दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवते. तुमच्या मुलाला रोज ब्रश करण्याची सवय लावा. जर मुलाला ब्रश करणे आवडत नसेल, तर त्याचे महत्त्व पटवून द्या

Bad Breath In Kids
Most Dangerous Fort In Maharashtra: डोळ्यांना स्वर्ग सुख देणारा महाराष्ट्रातील खतरनाक किल्ला, संध्याकाळ होण्यापूर्वीच परतावे लागते

3. जीभ साफ करणे

दातांसोबतच (Teeth) जिभेची स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. घाणेरड्या जिभेमुळे तोंडात बॅक्टेरिया राहतात, त्यामुळे हिरड्यांना त्रास होऊ लागतो. यासोबतच पोकळीची समस्याही आहे.

4. तोंडाने श्वास घेण्यामुळे

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या मुलांना तोंडातून श्वास घेण्याची सवय असते त्यांना अनेकदा तोंडातून दुर्गंधी येण्याची तक्रार असते. श्वासाच्या दुर्गंधीमुळे तोंडात लाळ कोरडी पडते. लाळ सुकल्याने बॅक्टेरिया वाढू लागतात, त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ लागते.

Bad Breath In Kids
Cholesterol Control Foods: मुळापासून नष्ट होईल कोलेस्ट्रॉल; हार्ट अटॅकचा धोका कमी, हे पदार्थ रोज खा

5. आरोग्य समस्या देखील कारण असू शकते

सायनस आणि टॉन्सिलिटिस हे देखील मुलांमध्ये दुर्गंधीचे कारण (Reason) असू शकतात. यासोबतच पोटात संसर्ग झाल्यामुळे तोंडातून दुर्गंधीही येऊ लागते. असे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com