Hair Falls Problem: झरझर वाढतीलच! केस प्रमाणापेक्षा जास्त गळताय? फुलांपासून बनवा आयुर्वेदिक होममेड तेल, लगेच मिळेल रिजल्ट

Natural Remedies to Stop Hair Fall : केस गळती रोखण्यासाठी व केसांची वाढ होण्यासाठी आपण त्यावर अनेक रासायनिक पदार्थांचा वापर करतो परंतु, असे करणे खरेच योग्य असते का?
Hair Falls Problem
Hair Falls ProblemSaam Tv
Published On

Causes Of Hair Falls : केसगळतीची समस्या हल्ली प्रत्येक वयोगटातील लोकांना पडते आहे. प्रदुषण, खाण्यापिण्याच्या सवयी व अपूरी झोप यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. केस गळती रोखण्यासाठी व केसांची वाढ होण्यासाठी आपण त्यावर अनेक रासायनिक पदार्थांचा वापर करतो परंतु, असे करणे खरेच योग्य असते का?

केसांवर रसायनांचा वापर केल्यास त्यांचे पोषक तत्त्व कमी होते व त्यामुळे केस गळतीची समस्या वाढते. केसांच्या वाढीसाठी आपण अनेक नवनवीन प्रयोग करतो. परंतु, ही समस्या जैसे थे च आहे. अशावेळी वेगवेगळे उपाय करण्याऐवजी नैसर्गिक तेलाच्या साहाय्याने फॉलिकल्स मजबूत करता येतात आणि टाळूचा कोरडेपणाही दूर होऊ लागतो. त्यामुळे केसांची वाढ सहज होते. आयुर्वेदातील औषधी वनस्पतींपासून बनवलेल्या दोन नैसर्गिक तेलांची पद्धत जाणून घ्या, ज्यामुळे केस (Hair) गळतीची समस्या लगेच थांबू शकते.

Hair Falls Problem
White Hair Problem: फक्त खोबरेल तेलात मिसळा हा पदार्थ; पांढरे केस होतील काळेभोर-दाट, घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीने डाय

1. कसे बनवाल घरगुती तेल

A. कोकोनट हिबिस्कस तेल

  • खोबरेल तेल १ कप

  • कढीपत्ता (Curry leaves) मूठभर

  • आवळा १ ते २

  • मेथी दाणे २ चमचे

  • जास्वंदीची फुले १ ते २

Hair Falls Problem
Cholesterol Control Foods: मुळापासून नष्ट होईल कोलेस्ट्रॉल; हार्ट अटॅकचा धोका कमी, हे पदार्थ रोज खा

B. कृती

  • कोरडे काचेची बरणी घ्या आणि त्यात खोबरेल तेल घाला. आता त्यात कढीपत्ता, आवळा, मेथी दाणे आणि हिबिस्कसची फुले टाकून बंद करा.

  • ही बरणी रोज १ ते २ तास उन्हात ठेवा आणि नंतर गाळून १ आठवड्यानंतर केसांना लावा.

  • याशिवाय कढईत खोबरेल तेल टाकून मंद आचेवर ठेवा. आता त्यात कढीपत्ता, आवळा, मेथी दाणे (Fenugreek seeds) आणि हिबिस्कसची फुले टाका.

  • यानंतर, ही कृती 25 ते 30 मिनिटे मंद आचेवर शिजवा. जेव्हा तेलाचा रंग पूर्णपणे बदलतो.त्यावेळी गॅस बंद करून तेल थंड होण्यासाठी ठेवावे. आता तेल (Oil) गाळून केसांना लावा.

  • आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा लावल्यास केसांचा पोत सुधारेल व केस गळतीची समस्या रोखण्यास मदत होईल.

Hair Falls Problem
Monsoon Hair Care : केसांच्या टाळूला सतत खाज लागते? पावसाळ्यात केस तेलकट व चिकट होतात? घरगुती उपाय ट्राय करुन पाहाच

2. भृंगराज कडुलिंबाचे तेल

A. साहित्य

  • खोबरेल तेल 1 कप

  • तीळ तेल 1/2 कप

  • एरंडेल तेल 1/2

  • ब्राह्मी मूठभर

  • भृंगराज मूठभर

  • कडुनिंब

  • 1 चमचे कढीपत्ता

  • 1 चमचे मेथी दाणे

  • आवळा 2

  • जास्वंदीची फुले 3 ते 4

Hair Falls Problem
Belapur Station : जागा एकच पण रेल्वे स्टेशन दोन, नावही त्यांचे वेगळे

B. कृती

  • एका पॅनमध्ये खोबरेल तेल, तीळ आणि एरंडेल तेल एकत्र करा. त्यांना मंद आचेवर शिजू द्या.

  • त्यानंतर तेलात ब्राह्मीची पाने, भृंगराज, कडुलिंब, मेथी, आवळा आणि कढीपत्ता घाला. आता त्यात २ ते ३ हिबिस्कसची फुले टाका आणि ढवळत राहा.

  • 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर शिजवा. तेलाचा रंग बदलला की, गॅस बंद करून तेल थंड करायला ठेवा. गाळून बरणीत भरा

  • आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा लावल्यास केसांची वाढ होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com