How To Prevent White Hair : हल्ली वाढत्या वयात केस अकाली पांढरे होताय. केसगळतीची समस्या ही म्हातारपणी नाही तर वेळेआधीच सर्वांना सतावते आहे. केस पांढरे होऊ लागले की, आपण ते काळेभोर करण्यासाठी अनेक नवनवीन उपाय करतो.
केसांना काळे करण्यासाठी त्याला डाय, मेंहदी व इतर अनेक प्रकारचे रासायनिक उत्पादनाचा वापर करतो. ज्याचा संपूर्ण केसांवर परिणाम होतो. त्यामुळे काळेभोर असणारे केस पिकू लागतात. त्यासाठी पांढरे केस काळे करण्यासाठी आपण काही घरगुती उपचारांची मदत घेऊ शकतो. केस दाट, काळे आणि मुलायम बनवण्यात प्रभावी ठरतो. कांद्याची बिचा योग्य रित्या वापर केल्यास ते काळेभोर व दाट होण्यास मदत होईल.
1. पांढऱ्या केसांसाठी कांद्याची बी फायदेशीर
कांद्याच्या बिया या लहान काळ्या बियांसारख्या असतात ज्या अन्नपदार्थात वापरतात. या काळ्या बियांचा वापर मसाला म्हणून केला जातो. याचे फायदे देखील बरेच आहेत. त्याला कलौंजी म्हणूनही ओळखले जाते. कलौंजीच्या बियांमध्ये अनेक आवश्यक फॅटी ऍसिड असतात जे केसांच्या वाढीसाठी प्रभावी असतात. यामध्ये असणारे दाहक-विरोधी गुणधर्म टाळू स्वच्छ करण्यासाठी व कोंडा दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. याच्या वापरावे केसांचे नुकसानही कमी होते.
2. कसा कराल वापर?
पांढऱ्या केसांची (Hair) समस्या दूर करण्यासाठी कांद्याच्या बीमध्ये खोबरेल तेल (Oil) मिक्स करून तेल बनवता येते. याच्या नियमित वापराने पांढरे केस काळे होऊ लागतात. तेल बनवण्यासाठी खोबरेल तेलात कांद्याच्या बिया घाला आणि हे तेल 5 ते 10 मिनिटे शिजवा. तेल शिजल्यावर ते थंड करून गाळून घ्या. हे तेल केसांना लावता येते. हे तेल केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावा. सकाळी उठल्यानंतर केस धुवा. काही दिवसांच्या वापरानंतर केस मुळापासून काळे होऊ लागतात.
3. हेअर डाय कसे बनवाल?
पांढऱ्या केसांवर (White Hair) कांद्याची बी वापरण्याचा आणखी एक मार्ग आहे. यासाठी मेहंदी एकत्र करून केसांसाठी डाय बनवता येतो. हे हेअर डाई करण्यासाठी कांद्याच्या बिया एका भांड्यात घेऊन बारीक करा. त्यात मेहंदी मिसळा आणि पेस्ट तयार करुन घ्या. केसांना लावून काही तास तसेच ठेवा. काही काळानंतर धुवून टाका. असे नियमित केल्याने केस काळेभोर होतील.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.