कोमल दामुद्रे
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने अनेक आरोग्याचे विकार दूर होतात. कोमट पाणी पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर पडते आणि शरीरात साठलेली चरबी कमी होऊ लागते.
गरम पाणी प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते.
बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्येत आराम मिळतो. शौच प्रक्रिया सुलभ होते.
रोज कोमट पाणी प्यायल्याने दात दीर्घकाळ निरोगी राहतात.
नियमितपणे एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने नाक बंद होणे आणि सायनसच्या समस्यांपासून आराम मिळेल.
गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचेवरील डागांची समस्या दूर होते.
मासिक पाळी आल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने पीरियड क्रॅम्प्स, कंबरदुखी आणि पायदुखीच्या समस्येत आराम मिळेल.
कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
शरीरात योग्य रक्ताभिसरण होईल, जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
जास्त गरम पाणी पिऊ नका हे लक्षात ठेवा. पाणी कोमट असावे जेणेकरून तोंड जळणार नाही.