Monsoon Hair Care : केसांच्या टाळूला सतत खाज लागते? पावसाळ्यात केस तेलकट व चिकट होतात? घरगुती उपाय ट्राय करुन पाहाच

Home Remedies For Itchy Scalp : पावसाळा सुरु झाल्यावर आरोग्याची कितीही काळजी घेतली तरी केसांची काळजी घेणे आपल्या जमत नाही.
Monsoon Hair Care
Monsoon Hair CareSaam tv
Published On

Dandruff Problem : पावसाळा सुरु झाल्यावर आरोग्याची कितीही काळजी घेतली तरी केसांची काळजी घेणे आपल्या जमत नाही. पावसाच्या खराब पाण्यामुळे आपल्या आरोग्यासोबत केसांवरही परिणाम होतो. दुषित पाण्यामुळे स्किन इन्फेक्शन वाढते.

तसेच केसांमध्ये फंगल इन्फेक्शनची समस्याही या ऋतूत मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे टाळूमध्ये खूप खाज आणि कोंडा होतो. काळजी न घेतल्यास त्यांची स्थिती खूप गंभीर होऊ शकते, त्यामुळे पावसाळ्यात चेहरा, हात आणि पाय तसेच केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही स्कॅल्प इन्फेक्शनची समस्या असेल तर या उपायांनी यापासून मुक्ती मिळवा.

Monsoon Hair Care
Benefits Of Drinking Black Tea : सकाळी काळा चहा पिण्याचे फायदे तुम्हाला माहितेय का?

1. केस स्वच्छ ठेवा

बुरशीजन्य संसर्गापासून केस (Hair) सुरक्षित ठेवण्यासाठी ते नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. जर तुमचे केस पावसात (Monsoon) भिजल्यामुळे ओले झाले असतील तर ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या. ओले केस बांधून ठेवल्याने संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

2. खोबरेल तेल लावा

नारळाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे लावल्याने स्कॅल्प इन्फेक्शनची समस्या दूर होते आणि डोक्यात रक्ताभिसरण वाढते. तुम्हाला हवे असल्यास नारळाच्या तेलातही मेथीचे दाणे वापरू शकता. एका भांड्यात खोबरेल तेल आणि मेथीच्या बियांची पावडर मिक्स करून केसांना मसाज करा. यामुळे बुरशीजन्य संसर्गापासूनही (Infection) आराम मिळेल.

Monsoon Hair Care
Post Workout Hair Care Routine : वर्कआउट केल्यानंतर केसात घाम जमा होतो ? डोक्याला खाज लागते ? मग अशाप्रकारे घ्या काळजी

3. कडुलिंब

कडुलिंबाचे तेल बुरशीजन्य संसर्गापासून आराम देण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाचे तेल बाजारात सहज उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, आपण ते दुसऱ्या प्रकारे देखील वापरू शकता. यासाठी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवा. त्यात थोडा लिंबाचा रस आणि हळद घाला. ही पेस्ट केसांना लावा आणि नंतर धुवा. इन्फेक्शन रोखण्यासाठी ही पेस्ट फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com