हवामानातील बदलाचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्याला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ऑक्टोबर हिट कमी होत असून राज्यातील काही भागात गारवा जाणवू लागला आहे.
हिवाळा सुरु झाला की, आपल्याला सर्दी-खोकल्यासारखे आजार सहज बळावतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण प्रत्येक जण उबदार कपडे आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी बदलतो. परंतु, जर तुम्हाला मधुमेह असेल तर या ऋतूत काळजी घ्यायला हवी. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी हिवाळ्यात आहारामध्ये काही प्रमाणात बदल केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते. हिवाळ्यात आहारात कोणत्या सुपरफूडचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया.
1. गाजर
हिवाळ्यात बाजारात सगळीकडे पाहायला मिळतात ते गाजर (Carrot). या ऋतूमध्ये गाजरला आपल्या आहाराचा भाग बनवा. यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे रक्तप्रवाहात साखरेचे उत्सर्जन कमी करते. तसेच आहारात सॅलड, सूपचा समावेश करा.
2. दालचिनी
दालचिनीचा वापर अनेकदा जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. जेवणाची चव वाढवण्यासोबत रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिंडंट् समृद्ध घटक असून तणाव कमी करण्यास मदत होते ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. दालचिनी ग्लुकोज आणि ट्रायग्लिसराइड्स दोन्ही पातळी सामान्य करते, मधुमेह आणि अनेक हृदयरोगांचा (Heart Care) धोका कमी करते.
3. आवळा
आयुर्वेदात आवळा हा औषधी गुणधर्म म्हणून ओळखला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये जीवनसत्त्व क अधिक प्रमाणात असते. ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. ज्यामुळे हिवाळ्यात याचे सेवन केल्यास मधुमेहांना फायदा होतो.
4. बीट
मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी बीटरुट अधिक फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियम, लोह, मॅंगनीज आणि फायटोकेमिकल्स सारख्या फायबर आहेत. रक्तातील साखर कमी करण्यासाठी आणि शरीरातील इन्सुलिनची पातळी राखण्यासाठी मदत करते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.