Indian Politics: 'INDIA' आघाडीत बिघाडी? नितीश कुमार यांचा काँग्रेसवर घणाघात

Indian Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या आघाडीत म्हणावे तसे काम होत नाही आणि काँग्रेसला पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येच रस असल्याची टीका केली आहे
Indian Politics
Indian PoliticsSaam Digital
Published On

Indian Politics

भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या आघाडीत म्हणावे तसे काम होत नाही आणि काँग्रेसला पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येच रस असल्याची टीका केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत सारेकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाटना येथे भाजप हटाओ, देश बचाओ अंतर्गत सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जाहिर नाराजी व्यक्त केली. ज्यांनी देशाचा इतिहास बदलला त्यांना हटवण्यासाठी ही युती झाली आहे. मात्र, काँग्रेस आजकाल पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे.या राज्यांच्या निवडणुका संपताच ते पुन्हा बैठका बोलावतील. आघाडीतील सर्व पक्ष काँग्रेसला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यांना मात्र या सर्व गोष्टींची आतापासूनच चिंता नाही, अशी टीका त्यांनी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडिया आघाडीतील पक्षांना एकत्र आणण्यात नितीश कुमार यांची महत्त्वाची भूमिका आहे. भाजपसोबतची युती तोडल्यानंतर नितीश कुमार देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी परिश्रम घेत होते. त्यात त्यांना यशही आले.आघाडीची पहिली बैठक पाटणामध्येच झाली होती. त्यानंतर मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या युतीला इंडिया नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Indian Politics
MP Mohammad Faisal : लोकसभेत वाढली शरद पवार गटाची ताकद; मोहम्मद फैजल यांना खासदारकी पुन्हा बहाल

भाजपवर साधला निशाणा

नितीश कुमार यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधला. केंद्रातील भाजप सरकारचा स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांना महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य लढ्याचा विसर पडला आहे. देशाचा इतिहास बदलण्याचा घाट या पक्षाने सत्तेत आल्यापासून घातला आहे. त्यामुळे अशा पक्षाला सत्तेतून खाली खेचून देश वाचविण्याची गरज आहे. त्यासाठीच इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे ते म्हणाले.

Indian Politics
ED, Rajasthan News: ED अधिकाऱ्यावरच ACB ची धाड; ताब्यातही घेतलं, नेमका कोणत्या प्रकरणात अडकला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com