- संजय सूर्यवंशी
Nanded Maratha Andolan : नांदेडहून हैद्राबादला निघालेल्या अंबडचे आमदार राजेश राठोड (mlc rajesh rathod) यांच्या वाहनावर आंदाेलकांनी दगडफेक केल्याची घटना काही वेळापूर्वी नांदेड (nanded news) जिल्ह्यात घडली. या घटनेनंतर काही आंदाेलकांनी वाहन पेटवण्याचा प्रयत्न केला. पाेलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. (Maharashtra News)
नांदेड जिल्ह्यातील कहाळा येथे आमदारांच्या वाहनावर दगडफेकीची घटना घडली. नायगाव तालुक्यातील कहाळा येथे सकल मराठा समाजाचा रास्ता रोको होता. अंबडचे आमदार राजेश राठोड हे हैद्राबादला निघाले असताना त्यांचे वाहन आंदोलनस्थळी येताच आंदोलकांनी वाहन राेखले. त्यावर दगडफेक केली. त्यानंतर चालकाने मुख्य रस्त्यावरून गाडी गावात वळवली.
त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आंदाेलकांनी वाहन जाळण्याचा प्रयत्न केला परंतु पाेलीसांनी आंदोलकांना हटकले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान नांदेडच्या कंधार तालुक्यातील पेठवडज येथे शालेय विद्यार्थ्यांनी तलावात उतरून आंदोलन केले. शाळेला न जाता आज गावातील विद्यार्थ्यानी पाण्यात उतरून आंदोलन केले. यावेळी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी करण्यात आली.
कुष्णूर येथील दगडफेक प्रकरणात नांदेड पोलीसांनी 40 जणांना ताब्यात घेतले. काल नायगाव तालुक्यातील कुष्णुर येथे रास्ता रोको करण्यात आला होता. नांदेड - हैदराबाद महामार्गावर हे आंदोलन सुरू होते. आंदोलनावेळी पोलिस आणि आंदोलकामध्ये वाद झाला. यावेळी दगडफेक करण्यात आली. यात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हाताला दुखापत झाली. दरम्यान या प्रकरणी कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. आज 40 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
हिमायतनगर शहर कडकडीत बंद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भोकर ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलन करून हिमायतनगर शहर कडकडीत बंद आहे. या महामार्गावर टायर जाळून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.