Rajasthan Politics, ED: राजस्थानात २५ ठिकाणी ED चे छापे; नेते, अधिकारीही रडारवर?

Rajasthan Politics, ED: मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी राजस्थानमध्ये तब्बल २५ ठिकाणी आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)छापेमारी केली
ED News
ED NewsSaam Tv
Published On

Rajasthan Politics, ED

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी राजस्थानमध्ये तब्बल २५ ठिकाणी आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)छापेमारी केली. जयपूर आणि दौसामधील ज्या अधिकाऱ्यांवर छापे टाकण्यात आले त्यामध्ये पीएचई विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध अग्रवाल यांचाही समावेश आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट्राचाराच्या या प्रकरणाशी संबंधिक आरोग्य अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.

ईडीच्या या कारवाईवरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकवण्यासाठी आणि भाजप व्यतिरिक्त अन्य राज्य सरकारे पाडण्यासाठी ईडीचा वापर करत असल्याचा आरोप गहलोत यांनी केला. कथित पेपर लिक प्रकरणात २०२२ मध्ये राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या मुलाला समन्स बजावल्यानंतर गहलोत यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला होता. ईडीने डोटासरा यांच्या जयपूर आणि सीकरमधील निवासस्थानांची झडती घेतली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरमध्ये विधासभा निवडणुकांसाठी मतदान आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी आहे. राजस्थान व्यतिरिक्त मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगना राज्याच्या निवडणुका आहेत. त्यावरून या धाडी सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

ED News
Indian Politics: 'INDIA' आघाडीत बिघाडी? नितीश कुमार यांचा काँग्रेसवर घणाघात

काही दिवसांपूर्वी कथित पेपर लिक प्रकरणी गोविंद सिंह डोटासरा यांच्या मुलाला ईडीने समन्स बजावले होते. माजी शिक्षणमंत्री डोटासरा यांच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. काँग्रेसचे आमदार ओम प्रकाश हुडला यांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली आहे. पेपर लिकप्रकरणी, मनी लॉन्ड्रिंग आणि पैशांची देवाणघेवाण झाल्याची गुप्त माहिती मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या आधी आरपीएस सदस्य बाबुलाल कटारा यांच्या चौकशीसंदर्भात आणि काही कोचिंग संचालकांविरोधात ईडीकडे तक्ररी करण्यात आल्या होत्या, त्यानंतर ईडीने कारवाई केली आहे.

ED News
MP Mohammad Faisal : लोकसभेत वाढली शरद पवार गटाची ताकद; मोहम्मद फैजल यांना खासदारकी पुन्हा बहाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com