Gondia Fraud: ऑनलाईन गेमिंगचा स्कॅम.. तरुणाला घातला तब्बल ५८ कोटींचा गंडा; आरोपींच्या घरात सापडलं मोठं घबाड

Gondia Crime News: नागपुरमधील एका तरुणाची तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
Gondia Crime News
Gondia Crime NewsSaamtv

शुभम देशमुख, प्रतिनिधी

Online Gaming Fraud:

डिजीटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहारही ऑनलाई होत आहेत. या ऑनलाईन व्यवहारांमुळे फसवणुकींचे गुन्हे उघडकीस येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली नागपुरमधील एका तरुणाची तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागपूरच्या (Nagpur) तरुणाची ५८ कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन तब्ब्ल तीन महिन्यानंतर नागपूर पोलिसांना शरण आला असून त्याच्या चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत.

यामध्ये सोंटू जैनला गोंदियातील (Gondia) डॉ गौरव बगा आणि ऍक्सिस बँकेचे मॅनेजर अंकेश खंडेलवाल यांनी आर्थिक व्यवहारात मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांच्याही घरावर नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज धाड टाकत कोट्यवधी रुपयांची रोकड आणि २ किलोंपेक्षा जास्त सोन्याची बिस्कीटे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gondia Crime News
Buldana Crime New: डॉक्टरचे कपडे उतरवले, आक्षेपार्ह व्हिडीओ काढून २० लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल, नंतर...

याआधी २२ जुलै २०२३ ला सोंटू जैन याच्या घरावरही नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली होती. त्यावेळी १६ कोटी ८९ लक्ष रुपये रोख, १२ किलो ४०३ ग्रॅम सोने आणि २९४ किलो चांदी जप्त केली होती.

दरम्यान, सोंटू जैन याला ज्या लोकांनी मदत केली आहे, त्यांचा शोध नागपूर आर्थिक गुन्हे शाखा घेत असून आणखी आरोपी अटक होणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि माध्यमांना दिली आहे. दुसरीकडे गोंदियात पांढऱ्या कपड्याच्या व्यवसायात काळे काम करणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Gondia Crime News
MLA Disqualification Case: मोठी बातमी! 34 याचिकांची 6 याचिकेत विभागणी, आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com