Buldana Crime New: डॉक्टरचे कपडे उतरवले, आक्षेपार्ह व्हिडीओ काढून २० लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल, नंतर...

Buldhana News: संतापजनक! अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; बुलढाण्यात डॉक्टला मागितली २० लाखांची खंडणी
Buldana Crime News
Buldana Crime NewsSaam tv

Buldana Crime News:

बुलढाण्यातून एक संतापजनक घटना समोर आलीये. येथील एका डॉक्टरला मारहाण करून त्याच्याकडून तब्बल २० लाखांची खंडणी मागण्यात आलीये. पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसेच ५ जणांना पकडण्यात यश आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldana Crime News
Pune Crime: शस्त्राचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटले; सराईत गुन्हेगारासह दोघांवर मोक्काची कारवाई

बुलढाणा शहरातील एका डॉक्टरला कॅन्सरच्या पेशंटला तपासायचे आहे, असे सांगून अज्ञात ठिकाणी नेलं गेलं. नंतर डॉक्टरला मारहाण करण्यात आली. यासह त्यांच्या जवळील १० हजार रुपये लुटण्यात आलेत. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी डॉक्टरांच्या मुलांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. यासह डॉक्टरचे कपडे काढून अश्लील व्हिडीओ बनवण्यात आला.

पुढे आरोपींनी हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि खंडणी म्हणून 20 लाख रुपये मागितले. अॅडवांस म्हणून तब्बल साडेआठ लाख रुपये या डॉक्टरांकडून वसूल देखील करण्यात आले आहेत. घाबरलेल्या डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आठ जणांविरोधात बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आठ जणांपैकी पाच जणांना बुलढाणा पोलिसांनी अटक केलीये. तर इतर आरोपींच्या शोधात पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडालीये.

२५ वर्षीय तरुणाची भरदिवसा निर्घुण हत्या

काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात २५ वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून ही भयंकर घटना घडली. या प्रकरणी आरोपी त्रिशरण रामदास इंगळे यास पोलीसांनी तात्काळ अटक केली. बुलढाण्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत.

Buldana Crime News
Dahisar Crime News: चोरीच्या नादात पाय फॅक्चर, दातही तुटले; स्पायडरमॅन चोर पोलिसांच्या ताब्यात, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com