MLA Disqualification Case: मोठी बातमी! 34 याचिकांची 6 याचिकेत विभागणी, आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं?

Shiv Sena MLA Disqualification Case: मोठी बातमी! 34 याचिकांची 6 याचिकेत विभागणी, आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं?
Shiv Sena MLA Disqualification Case
Shiv Sena MLA Disqualification CaseSaam TV
Published On

गिरीश कांबळे

Shiv Sena MLA Disqualification Case:

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता आमदार अपात्रतेच्या 34 याचिकांची 6 याचिकेत विभागी करण्याचा निर्णय आज नार्वेकर यांनी घेतला आहे. यात 1 ते 16 ठाकरे गटाच्या याचिका आहेत. यात 3 अपक्ष आमदारांच्या याचिका आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी दिली आहे.

सनी जैन आज झालेल्या सुनावणीबद्दल माहिती देताना सांगितलं आहे की, सगळ्या याचिका एकत्रित करण्याची आमची मागणी होती. पण 30 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यावर आता बोलू शकत नाही. दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी ही 26 ऑक्टोबरला होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shiv Sena MLA Disqualification Case
Garba Late Night Permission: आता मध्यरात्रीपर्यंत बिनधास्त खेळा गरबा! ३ दिवस रात्री १२ पर्यंत गरब्याला परवानगी

आजच्या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना २५ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी युतीवाद करताना सांगितलं की, ठाकरे गटाच्या शिवसेनेने आमदारांना ईमेलद्वारे जो व्हिप बजावला होता. तो आम्हाला मिळाला नाही. (Breaking Marathi News)

34 वेगवेगळ्या याचिका आता यापुढे 6 याचिकेत मांडल्या जातील

1. पहिल्या मिटींग हजर राहिले नाही.

2. दुसऱ्या मिटींगला उपस्थितीत नव्हते

3. स्पीकर विरोधात मतदान करणे

4. बहुमत चाचणीमध्ये व्हीप विरोधात मतदान

5. भरत गोगावले यांचा व्हीप मोडला याची याचिका

6. अपक्ष आमदार गट याचिका   (Latest Marathi News)

Shiv Sena MLA Disqualification Case
Kalyan News : आई- वडिलांना अपेक्षा होती पोलिस बनायची; खुश करण्यासाठी केला अजब प्रताप

आजच्या सुनावणीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब म्हणाले आहेत की, ''सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गट तयार केले आहे आणि पुढील सुनावणी होईल, असं अध्यक्ष म्हणाले. शिंदे गटाने दाखल केलेल्या 2 याचिका आणि ठाकरे गटाने दाखल केलेल्या 4 याचिका असे एकूण 6 गट आहेत. आता त्यांना वेळापत्रक दाखल करून सांगायचं आहे की, या सगळ्यावर एकत्रित निर्णय कधी देणार.''

परब म्हणाले की, ''आमचा म्हणणं आहे की, 2 आठवड्यात यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. 2 अर्ज केले गेले आहेत. एक आमच्या बाजूने आणि 1 त्यांच्या बाजूने. आता कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी 25 तारखेपर्यंत वेळ दिला जाईल, तर 26 तारखेला पुढील सुनावणी होईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com