Garba Late Night Permission: आता मध्यरात्रीपर्यंत बिनधास्त खेळा गरबा! ३ दिवस रात्री १२ पर्यंत गरब्याला परवानगी

Late Night Garba: नवरात्रीच्या काळात दोन ऐवजी तीन दिवस रात्री १२ पर्यंत गरबा दांडिया खेळायला परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली होती.
Garba Late Night Permission
Garba Late Night PermissionSaam TV
Published On

Garba News:

गरबा रसिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. तरुणांना आता फक्त दोन नाही तर तीन दिवस लेटनाईट गरबा खेळता येणार आहे. रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यासाठी परवानगी मिळालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी गरबा खेळण्यासाठी फक्त २२ आणि २३ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी होती. मात्र आता गरबा प्रेमिंच्या मागणीमुळे २१ ऑक्टोबरलाही रात्री १२ वाजेपर्यंत गरब्यास पोलिसांनी परवानगी दिलीये.

Garba Late Night Permission
Video Call Problem : प्रेयसीशी व्हिडिओ कॉलवर बोलताना येतोय अडथळा ? फोनमधील ही सेटिंग्ज बदला आणि दिलखुलास गप्पा मारा

प्रवीण दरेकरांची मागणी पूर्ण

२१, २२ व २३ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे तरुणाईचा आनंद द्विगुणीत झालाय. आमदार प्रवीण दरेकर यांनी याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. नवरात्रीच्या काळात दोन ऐवजी तीन दिवस रात्री १२ पर्यंत गरबा दांडिया खेळायला परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली होती.

नवरात्रीच्या काळात दिवसाला दीड लाख लोक गरबा आणि दांडिया खेळायचा आनंद घेतात. त्यामुळे या सर्व रसिकांना खेळासाठी आणखी एक दिवस रात्री १२ पर्यंत आवाजाची मर्यादा शिथील करण्यात आलीये. यामुळे गरबा रसिकांनी मोठा आनंद व्यक्त केलाय.

नवरात्री म्हटलं की, सलग नऊ दिवस मोठा उत्सव आणि जल्लोष पाहायला मिळतो. तरुणांपासून अगदी वयोवृद्ध आणि लहान मुलं देखील गरब्याच्या गाण्यांवर ठेका धरतात. वर्कींग असलेले मुलं मुली कामावरून घरी गेल्यावर रात्री उशीरा ९ पर्यंत गरबा खेळण्यासाठी पोहचतात. गरबा रात्री १० ते १०.३० पर्यंत संपतो त्यामुळे त्यांना जास्त वेळ खेळता येत नाही. त्यामुळे आता ३ दिवस गरबा प्रेमींसाठी १२ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलीये.

Garba Late Night Permission
Crime News : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बँक मॅनेजरला मागितली अडीच लाखांची खंडणी, महिलेसह एकास अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com