Video Call Problem : प्रेयसीशी व्हिडिओ कॉलवर बोलताना येतोय अडथळा ? फोनमधील ही सेटिंग्ज बदला आणि दिलखुलास गप्पा मारा

Smartphone Settings : व्हिडिओ कॉलिंग दरम्यान वारंवार आवाज आणि व्हिडिओ व्यत्यय येण्याची समस्या खूप सामान्य आहे.
Video Call Problem
Video Call ProblemSaam Tv
Published On

Video Calling Disturbance :

व्हिडिओ कॉलिंग दरम्यान वारंवार आवाज आणि व्हिडिओ व्यत्यय येण्याची समस्या खूप सामान्य आहे. जर तुम्हाचा व्हिडिओ कॉल वारंवार डिस्कनेक्ट होत असल्याच्या समस्येने त्रास होत असेल, तर एक चांगला पर्याय आहे.

जो तुम्ही तुमच्या फोनची (Phone) सेटिंग्ज सहज वापरून पाहू शकता. VoLTE टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्हाला अधिक चांगला व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव मिळू शकतो. यामध्ये व्हिडिओ आणि ध्वनी गुणवत्ता देखील तुलनेने चांगली आहे.

व्हॉईस ओव्हर LTE किंवा VoLTE ही एक प्रगत सेवा आहे जी HD गुणवत्ता, स्पष्ट आवाज आणि व्हिडिओ कॉल कॅपेबल करते. पण, यासाठी दोन गोष्टींची खात्री करावी लागेल, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे Airtel, Jio किंवा Vi चे हायस्पीड 4G इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे, दुसरे म्हणजे तुमच्या स्मार्टफोनमध्ये VoLTE कॉलिंग फीचर असायला हवे. तसेच, नवीनतम सॉफ्टवेअरसह अपडेट करणे आवश्यक आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Video Call Problem
Smartphone Hang Solution : फोन वारंवार हँग होतोय? या स्टेप्स फॉलो करुन फोनची सेटिंग्सकडे लक्ष द्या

याप्रमाणे सक्रिय करा

  • जर तुम्ही अँड्रॉइड यूजर असाल तर स्मार्टफोनच्या (Smartphone) सेटिंग्जमध्ये जा.

  • यामध्ये तुम्ही 'Mobile Network' हा पर्याय निवडा.

  • येथे VoLTE कॉल चालू करा.

  • जर तुम्ही iOS वापरकर्ते असाल तर सेटिंग्जमध्ये जा आणि मोबाइल डेटा निवडा.

  • येथे 4G सक्षम करा आणि 'व्हॉइस आणि डेटा' कॅपेबल करा.

Video Call Problem
Best Smartphone Under 15000: ऑफर्सचा धमाका! कमी किमतीत खरेदी करा जबरदस्त 5G स्मार्टफोन,पाहा लिस्ट

असा व्हिडिओ कॉल करा

तुमच्या स्मार्ट फोनवरील फोन आयकॉनवर जाऊन सामान्य कॉल सुरू करा.

येथे तुम्हाला व्हिडिओ कॉलचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर सामान्य कॉल व्हिडिओ कॉलमध्ये रूपांतरित होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com