Crime News : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बँक मॅनेजरला मागितली अडीच लाखांची खंडणी, महिलेसह एकास अटक

या प्रकरणाचा पुढील तपास आता भोसरी पोलीस करत आहेत.
Pimpri Chinchwad Crime News
Pimpri Chinchwad Crime Newssaam tv
Published On

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवड शहरात एका राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक मॅनेजरला अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पाेलीसांनी एकास ताब्यात घेतले आहे. दरम्यान गुन्हे शाखेच्या दोन पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बॅटरी चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. (Maharashtra News)

Pimpri Chinchwad Crime News
Political News : 'नितेश राणेंना अक्कल नाही, आम्हांला शहाणपण शिकवू नये'

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार बँक मॅनेजरला त्याचे व्हिडिओ चॅट आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एक महिला आणि एका पुरुषाने अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीसांच्या खंडणी विरोधी पाेलीस पथकांने गणेश लक्ष्मण कोळी आणि एका महिलेस खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

Pimpri Chinchwad Crime News
Shegoan Pandharpur Highway : पालखी मार्ग दुरस्ती करा, अन्यथा रोड ब्लास्ट करू; मुख्यमंत्र्याच्या गटातील आमदारांचा गर्भित इशारा

या दोन्ही संशयितांवर भोसरी पोलीस ठाण्यात (भादवी कलम 384, 386, 387, 504 आणि 34 अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता भोसरी पोलीस करत आहेत.

दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बॅटरी चोरणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलीसांच्या गुन्हे शाखा दोन पथकास यश आले आहे. या टोळीत चार सज्ञान संशयितांचा तर दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Pimpri Chinchwad Crime News
Talegoan MIDC : अन्याय झाला तर गाठ माझ्याशी... सत्ताधारी आमदारांचा उद्याेगमंत्र्याच्या साक्षीने सरकारला गर्भित इशारा

पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत लोकांच्या सुरक्षा करिता मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र काही चोर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही कॅमेरासाठी लावण्यात आलेल्या बॅटरी मोठया प्रमाणात चोरी करत असल्याच्या तक्रारी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.

त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार ओंकार सुरेश पवार आणि जफर जैद सिद्दिकी असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

Pimpri Chinchwad Crime News
Maratha Or Kunbi : मराठा की कुणबी? नितेश राणेंनी दिले मनोज जरांगेंना चर्चेचे निमंत्रण

स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेरा बॅटरी चोरी करण्यासाठी ही टाेळी दुचाकी चोरी देखील करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखा दोन पोलीस पथकाने या दोन्ही संशयितांकडून एकूण चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. त्यातून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com