Maval News : जनरल मोटर्सच्या कामगारांवर अन्याय झाला तर त्या नामांकित कंपनीला मावळात पाय ठेवू देणार नाही असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांच्या समोरच दिला. यामुळे सत्तेत सहभागी असलेल्या मावळचे आमदार सुनील शेळकेंनी (mla sunil shelke) कामगारांच्या हिताचा विचार करीत सरकारलाच घरचा आहेर दिल्याची जाेरदार चर्चा मावळात सुरु आहे (Maharashtra News)
मावळात गेल्या वीस दिवसांपासून जनरल मोटर्सच्या एक हजार कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. सरकारचा निरोप घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कामगारांच्या उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या समोरच सरकारला कडक शब्दांत इशारा दिला.
आमदार सुनील शेळके म्हणाले जनरल मोटर्स कंपनी आणि कामगार मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी सेटलमेंट केली नसती तर मावळ मधील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली नसती. कामगार मंत्रालयाने क्लोजर रिपोर्ट देताना कामगारांची बाजू ऐकून घेतली नाही.
कोर्टाचा निकाल येण्याआधीच क्लोजर रिपोर्ट देण्यात आला यामध्ये कामगारांना प्री प्लान करून अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असा आराेप देखील आमदार सुनील शेळके यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समोर केला.
आमदार शेळके म्हणाले मावळात येणाऱ्या नामांकित कंपनीचे आम्ही स्वागत करुच परंतु त्या कंपनीने जनरल मोटर्स मधील कामगारांवर अन्याय केला तर कंपनीला मावळ तालुक्यामध्ये पाय देखील ठेवू देणार नाही असा इशारा आमदार शेळकेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समोर सरकारला दिला.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.