Maharashtra : ओ साहेब पोतं उचलायला हात लावता का? जिल्हाधिका-यांचा फाेटाे Social Media त Viral

काही अंतरावरुन हा क्षण जिल्हाधिका-यांच्या मित्राने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपला.
Dr. Raja Dayanidhi
Dr. Raja Dayanidhi saam tv
Published On

Sangli News : ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का? ही मदतीची हाक ऐकताच जिल्हाधिकारी डाॅ. राजा दयानिधींनी (Dr. Raja Dayanidhi) हे मजूराच्या मदतीसाठी सरसावले. एक दाेन नव्हे तर जितकी घटनास्थळी पाेती हाेती ती सर्व उचलून जिल्हाधिका-यांनी मजूरास मदत केली. जिल्हाधिका-यांची मुंबईतील ही कृती सध्या समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

Dr. Raja Dayanidhi
Bar Council Of India : वकील रणजीतसिंह घाटगे याची सनद रद्द, १४ लाख दंड देण्याचाही हुकूम; जाणून घ्या पक्षकाराची तक्रार

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे मुंबईमध्ये निवडणूक आयोगाची बैठक आटपून बाहेर आले. त्यावेळी त्यांना एकाने "ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का" अशी विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही मागचा पुढचा विचार न करता मदत करण्याच्या दृष्टीने एक नवे दोन नव्हे तर चक्क तीन कांद्याची पोती छोट्या विक्रेत्यास उचलून दिली.

त्यांच्यासमवेत असलेले उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी जिल्हाधिका-यांची कृती पाहिली. त्यांनी काही अंतरावरुन हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपला. त्यानंतर पाटील यांनी डाॅ. राजा दयानिधी यांनी केलेल्या मदतीची माहिती ट्विट केली.

या ट्विटमध्ये पाटील यांनी राजा साहेबांचा एखादा फोटो काढावा व त्याच वेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले. कामाला तत्पर परंतु समाजात वावरताना पद व प्रतिष्ठा बाजूला ठेवून सर्वसामान्यांसारखा वागणारा वागणारा हा आमचा मित्र असल्याचे पाटील यांनी अभिमानाने नमूद केले आहे.

Dr. Raja Dayanidhi
Political News : लोकांना हार घालणे, गाड्या पाठवणे हा छंद योग्य नाही; देवेंद्र फडणवीसांच्या पीएचा नामाेल्लेख टाळत आमदाराचे शरसंधान

डाॅ. दयानिधी यांच्या कृतीची समाज माध्यमात चांगलीच चर्चा सुरु आहे. आणखी एका ट्विटमध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी साहेब कांद्याचे गोणपाट उचलायला मदत करतात. बरं साहेबांनी एखादं गोणपाट उचलून विषय संपला नाही.

तीनचार वेळा हा प्रकार घडला. प्रशासनात गेल्यावर जनतेचे मालक झाल्याच्या थाटात वावरणारे कुठे आणि नावातील दया प्रत्यक्षात आणणारे दयानिधी साहेब कूठे? असे नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com