- चेतन व्यास
Arvi Midc News : केवळ लोकांना बोलवून हार घालणे, गाड्या पाठवणे लोक जमा करणे हा छंद योग्य नाही. मी याचा धिक्कार करतो. माझ्या मतदार संघात कोणी कितीही लुडबुड केली तरी पक्ष मलाच निवडणुकीसाठी आगामी काळात देखील तिकीट देणार यात काही शंका नाही असा विश्वास आमदार दादाराव केचे (dadarao keche) यांनी व्यक्त केला. दरम्यान आर्वी एमआयडीसीवरुन आमदार केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy cm devendra fadnavis) यांचे पीए सुमित वानखेडे (sumit wankhede) यांच्यावर नाव न घेता टीकेची झाेड उठवली. (Maharashtra News)
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे औद्योगिक वसाहत मंजूर झाल्याची बातमी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी समोर आली. ही माहिती समोर येताच आर्वी विधानसभा क्षेत्रात श्रेयवादाची लढाई सुरु झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमित वानखेडे यांनी औद्योगिक वसाहत मंजूर झाल्याची माहिती समाज माध्यमावर टाकली आणि आर्वी विधानसभा मतदार संघात श्रेयवादाला सुरवात झाली.
वर्धा लोकसभा मतदार संघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सुमित वानखेडे यांच्याकडे आहे. भाजपा आमदार दादाराव केचे यांनी औद्योगिक वसाहतकरीता पूर्वीपासून आपण प्रयत्न करत असून मंत्रिमंडळाच्या उच्चाधिकारी समितीच्या 153 व्या बैठकीत मंजूर झाल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अधिवेशनात प्रश्नोतरात सांगितलं असल्याच सांगितलंय.
औद्योगिक वसाहत मंजूर केल्याचा मी स्वागत करतो कोणी काहीही पात्रता नसताना, मतदार संघाचा संबंध नसताना, विधानसभा सभागृहाचा संबध नसतानाही हे काम मीच केल असा आव आणण्यात काही अर्थ नाही, याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा आमदार दादाराव केचे यांनी नाव न घेता सुमित वानखेडे यांना दिला आहे.
एवढंच नव्हे तर केवळ लोकांना बोलवून हार घालणे, गाड्या पाठवणे लोक जमा करणे हा छंद योग्य नाही. मी याचा धिक्कार करतो. मतदार संघात कोणी कितीही लुडबुड केली तरी पक्षाची पुढची तिकीट मलाच मिळणार यात काही शंका नाही असे आमदार केचे यांनी उपमुख्यमंत्री यांचे पीए सुमित वानखेडे यांचे नाव न घेता टीका केली.
मतदार संघात सध्या जे सुरु आहे कोणीही असं वर्तन करू नये. आमदाराला आमदाराच काम योग्य रित्या करू द्यावे. माझ्याविरुद्ध कोणी किती प्रयत्न केले तरी माझी जनता माझ्या सोबत आहे. उपमुख्यमंत्री यांना औद्योगिक वसाहत निर्माण ह्यावी म्हणून विनंती केली होती त्यांनी शब्द दिला होता ते उपमुख्यमंत्री यांनी मंजूर केले असंही केचे म्हणाले.
औद्योगिक वसाहतीच श्रेय आमदार म्हणून माझं आहे. अधिवेशनात प्रश्न मी टाकला आणि मार्गीही मीच लावला असे आमदार केचे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. हा माझा अधिकार आहे.
जे काम इतिहासात (भूतकाळात) झाले नाही ते काम मी करून दाखविले आहे. हे काम मी करतो असं या संभ्रमात कोणीही राहू नये कारण दादाराव केचेत ही ताकत आहे. श्रेयअगोदर मीच सतर्क कोणीही असा प्रयत्न करू नये ते मी हाणून पाडणार असा इशाराही केचे यांनी यावेळी दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.