- रणजीत माजगावकर
Kolhapur News : राज्यभरात नवरात्राेत्सव माेठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या काळात विविध संघटना देखील वेगवेगळ्या उपक्रमांचे आयाेजन करीत असतात. त्यापैकीच एक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे देखील आहे. या प्रतिष्ठानतर्फे दुर्गादाैड याचे आयाेजन केले जाते. यंदा देखील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने राज्यभरात त्या त्या जिल्ह्यात दुर्गादाैडचे आयाेजन केले आहे. (Maharashtra News)
कोल्हापुरातील कसबा बावडा येथे देखील दुर्गादौडचे आज (साेमवार) आयाेजन केले गेले. दरम्यान दुर्गादाैडच्या मार्गावर काहींनी टिपू सुलतान संदर्भात विधान लिहिले. हे विधान दुर्गा दौड मार्गावरच लिहिण्यात आले. या विधानातून टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी दावा केला.
या प्रकारामुळे कसबा बावडा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कसबा बावडा परिसरात दुर्गादौंडच्या दुस-या दिवशी रस्त्यावर वाक्य लिहिल्याने तणाव निर्माण झाला हाेता. अखेर पाेलीसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची समजूत घातली. संबंधितांचा तपास करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे पाेलीसांनी कार्यकर्त्यांना आश्वासन देत परिस्थिती हाताळली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.