Kalyan News : मुलीचा मृत्यू, नातेवाईकांनी मुलाला काळे फासत दिला चोप; मुलीशी जबरदस्तीने लग्न लावल्याचा आरोप

Kalyan News : नातेवाईकांनी गंभीर आरोप करत जबरदस्तीने लग्न लावून तिला सातत्याने ब्लॅकमेल करण्यात आले. तसेच तिला मानसिक शारीरिक त्रास दिला
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: तीन महिन्यांपासून बेपत्ता मुलीचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मुलीच्या (Kalyan) नातेवाईकांनी गंभीर आरोप करत जबरदस्तीने लग्न लावून तिला सातत्याने ब्लॅकमेल करण्यात आले. तसेच तिला मानसिक शारीरिक त्रास दिला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. संतप्त नातेवाईकांनी (Crime News) रुग्णालयात मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांना चोप देत मुलाच्या तोंडाला काळे फासले. या प्रकरणाचा तपास टिटवाळा पोलिस करीत आहेत. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

Kalyan News
Chhagan Bhujbal News: चार तासापुर्वी कल्पना देऊनही पोलीस गाफील राहिले; मंत्री छगन भुजबळ यांनी डागली सरकारवरच तोफ

पुणे येथील निगडी परिसरात वास्तव्यास असलेले राजेंद्र रणदिवे यांची मुलगी अडीच महिन्यापूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. कल्याण पश्चिमेतील गाळेगाव परिसरात राहणाऱ्या रोहनसोबत त्याच्या नातेवाईकांनी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होेते. मुलीच्या वडिलांनी आरोप करत मुलीला या लोकानी कोंडून ठेवले. तिचे जबरदस्तीने लग्न लावले. तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याबाबत मुलीने संपर्क साधून सांगितले होते. मात्र दुसऱ्या दिवशी मुलगी मृत झाल्याचा फोन आला. मृतदेह कल्याणच्या रक्मीणबाई रुग्णालयात नेला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan News
Grampanchayat Election Result: नंदुरबार जिल्ह्याच्या ९ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा; राष्ट्रवादी, काँग्रेसला एकही जागा नाही

मुलाला फासले काळे 

रुग्णालयात मुलीच्या नातेवाईकासह आरपीआय निकाळजे गटाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, शालीनी वाघ पोहचले. मुलीसोबत ज्या मुलाचे लग्न झाले होते. तो मुलगा रोहन म्हस्के आणि रोहनची बहिण नेहा जाधव अन्य नातेवाईक रुग्णलायात होते. यावेळी मुलीच्या नातेवाईकांसह आरपीआयच्या पदाधिकार्यांनी रोहन आणि नेहाला चोप दिला. तर एका महिनेने राेहनला काळे फासले. टिटवाळा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी दिनकर चकोर हे देखील होते. रोहन आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून टिटवाळा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी मुलीच्या शवविच्छेदानाचा अहवाल काय येतो. त्यावरुनही काही गाेष्टी स्पष्ट होती. मुलगी अल्पवयीन होती. त्यामुळे हा प्रकार गंभीर आहे. त्याचा तपास आम्ही करीत आहोत असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com