Chhagan Bhujbal News: चार तासापुर्वी कल्पना देऊनही पोलीस गाफील राहिले; मंत्री छगन भुजबळ यांनी डागली सरकारवरच तोफ

Latur News : एसआयटी असेल न्यायालयीन चौकशी असेल काय करायचे ते करा यातील गुन्हे देखील मागे घेऊ नका असे म्हणत सरकारवरच भुजबळांनी तोफ डागली
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSaam tv
Published On

संदीप भोसले 
लातूर
: आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवल्यानंतर मला ज्यावेळी ही घटना समजली. त्यावेळी सुभाष राऊत हे माझ्यासोबत मंत्रालयात होते. त्याचवेळी (Beed) बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून कल्पना दिली होती. सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर दगडफेक होऊ शकते. चार तासानंतर हा प्रकार घडला असून बीडची पोलीस यंत्रणाच फेलिव्हर असल्याचे मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी सांगितले. (Maharashtra News)

Chhagan Bhujbal
Kalicharan Maharaj : धाराशिव लोकसभा निवडणूक लढवणार ? राजकारणातील प्रवेशाबाबत कालीचरण महाराज स्पष्टच बाेलले

मराठा आरक्षणासाठी आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी हल्ले करत तोडफोड केली होती. या दरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटविले तर राऊत यांच्या हॉटेलवर दगडफेक केली होती. यावर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस यंत्रणेवर बोट ठेवत सरकारवरच तोफ डागली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhagan Bhujbal
Nashik News : चांदवड तालुक्यात दुष्काळाचा पहिला बळी; शेतकऱ्याने संपविले जीवन

गुन्हे मागे घेऊ नका 
चार तास वेळ मिळून (Latur) देखील या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्यात आला नव्हता. यातच पोलिसांचे अपयश दिसते. याबरोबरच पोलिसांचा गुप्त वार्ता विभाग ही या प्रकाराची माहिती देऊ शकला नाही, हे अपयश आहे. यात एसआयटी असेल न्यायालयीन चौकशी असेल काय करायचे ते करा यातील गुन्हे देखील मागे घेऊ नका असे म्हणत सरकारवरच भुजबळांनी तोफ डागली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com