Maratha Reservation: आरक्षणाचा लढा तीव्र, आत्महत्यांचे सत्र थांबेना; २४ तासात ३ मराठा तरुणांनी संपवले आयुष्य

Beed News: बीडनंतर लातूरमध्येही दिवसभरात दुसरी आत्महत्येची घटना समोर आली आहे.
Maratha Reservation Protest
Maratha Reservation ProtestSaamtvnews
Published On

Maratha Reservation Protest:

मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. एकीकडे आरक्षणासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरले असतानाच आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. आज (२९, ऑक्टोंबर) बीडच्या गोवर्धन हिवरा या गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच लातूरमध्येही दिवसभरात दुसरी आत्महत्येची घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. काल बीडमध्ये एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच बीडच्या (Beed) गोवर्धन हिवरा या गावामध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

गंगाधर मोरे असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मोरे यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी आई-वडील असा परिवार आहे. दोन दिवसांमध्ये घडलेल्या या दुसऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation Protest
Manoj Jarange Patil: 'माझा आवाज चालू आहे, तोवर चर्चेला या…; मनोज जरांगे पाटलांचे सरकारला आवाहन

लातूरमध्येही आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या..

बीडप्रमाणे लातुरमध्येही (Latur) मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असून आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील गोंद्री या गावात 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. शरद भोसले असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच गोंद्री गावात पोलीस आणि प्रशासन दाखल झाले आहे. पण जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी आल्याशिवाय आणी लेखी आश्वासन दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेतलं जाणार नाही.. अशी भुमिका सद्या नातेवाईक आणि गावकर्यानी घेतली आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation Protest
Kerla Blast News : केरळमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, २० जण जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com