Manoj Jarange Patil: 'माझा आवाज चालू आहे, तोवर चर्चेला या…; मनोज जरांगे पाटलांचे सरकारला आवाहन

Maratha Reservation: आज ( २९ ऑक्टोबर ) जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळल्याचे दिसत आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsaam Tv
Published On

Manoj Jarange Patil:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज ( २९ ऑक्टोबर ) जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळल्याचे दिसत आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मला बोलायला येतयं तोपर्यंत चर्चेला या.. असा इशारा दिला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

आंदोलनाच्या पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना "मला बोलता येतेय, तोपर्यंत चर्चेला या. नंतर येऊन उपयोग नाही, असे आवाहन जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केले. तसेच माझे कुटुंब माझ्यासमोर आणू नका, कुटुबांला पाहिलं की हुंदका भरुन येतो, माणूस दोन पावले मागे येतो..." अशी भावूक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

तसेच पुढे बोलताना "मी कुटुंबाला मानत नाही, प्रथम समाजाचा नंतर कुटुंबांचा, जगलो तर तुमचा मेलो तर समाजाचा असे म्हणत तुमचा पोरगा गेला तर रडायचं नाही, पुढे पुढे बघा किती भयानक आंदोलन होईल," असा सूचक इशाराही जरांगे पाटलांनी यावेळी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Kaali Peeli Taxi: ६ दशकांच्या प्रवासाला कायमचा ब्रेक; मुंबईच्या रस्त्यांवरुन काळी - पिवळी 'पद्मिनी टॅक्सी' होणार गायब

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी सरकारने चर्चेसाठी यावे, आम्ही त्यांना अडवणार नाही, आज-उद्या सरकार येत असेल तर आम्ही त्यांना संरक्षण देऊ, पण सरकारने चर्चेसाठी यावं.. असे आवाहनही जरांगे पाटलांनी केले. (Latest Marathi News)

जरांगे पाटलांची प्रकृती ढासाळली..

पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांचा हात थरथरत होता. बोलताना मनोज जरांगे यांच्या हातातून माईकही खाली पडला. त्यांच्या या प्रकृतीबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली असून सरकारने लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती विरोधक करत आहेत.

Manoj Jarange Patil
Kanhaiya Kumar in Mumbai : महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा भाजपवर घणाघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com