Kanhaiya Kumar in Mumbai : महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा भाजपवर घणाघात

Congress leader Kanhaiya Kumar in Mumbai : कन्हैय्या यांनी देशात वारेमाप वाढलेली बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आदी गोष्टींवर सडकून टीका केली.
Kanhaiya Kumar in Mumbai
Kanhaiya Kumar in MumbaiSaam TV
Published On

Mumbai New :

महाराष्ट्राची भूमी ही संत महात्म्यांची भूमी आहे. ज्यावेळी देशभरात इंग्रजांविरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती, त्यावेळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ ही गर्जना महाराष्ट्रातूनच देशभरात दुमदुमली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीरांची ही भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांच्या या भूमीतील मराठी माणसांना गृहित धरण्याचं काम केंद्रातील आणि राज्यातील सरकार करत आहे.

पण मराठी माणूस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याच धास्तीपोटी हे सरकार निवडणुका घेत नसल्याची टीका काँग्रेस युवा नेते कन्हैय्या कुमार यांनी केली. मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मुंबईचा वाटा खूप मोलाचा आहे. पण आज हीच मुंबई पंतप्रधानांच्या मित्राला आंदण देण्याची तयारी केंद्र आणि राज्यातल्या सरकारने चालवली आहे, अशी टीका युवा नेते कन्हैय्या कुमार यांनी केली. NSUI चे प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आलेल्या कन्हैय्या यांनी देशात वारेमाप वाढलेली बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आदी गोष्टींवर सडकून टीका केली.

आपल्या मुंबई दौऱ्यात विविध कार्यक्रमांना पोलिसांकडून आडकाठी केली जात आहे. त्यात पोलिसांचा दोष नाही. पण हे लोक सामान्य जनतेला उत्तरदायी आहेत, हे त्यांना विसरून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह त्यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा टोलाही त्यांनी लगावला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kanhaiya Kumar in Mumbai
Maratha Aarakshan Protest: बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; एसटी बसच्या काचा फोडत केली दगडफेक

‘सबका साथ सबका विकास’, मग पात्रता निकष कशाला?

एकीकडे पंतप्रधान ‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा करतात आणि दुसऱ्या बाजूला मुंबईत पुनर्विकासाधीन असलेल्या लोकांना पात्रता निकष लावतात. समजा सगळे आपलेच असतील, तर मग हा पात्रता निकष कशासाठी, असा प्रश्न कन्हैय्या यांनी विचारला. धारावी पुनर्विकास प्रकल्पात हजारो लोकांना पात्रता निकष लावून बाद ठरवण्यात येत आहे. त्यावर सडकून टीका करताना कन्हैय्या यांनी पुन्हा ‘मोदींच्या मित्रा’चा उल्लेख केला.

देशात दर तासाला एका विद्यार्थ्याची आत्महत्या

पंतप्रधान मोदींनी आज विद्यार्थ्यांसाठी खास अॅपची घोषणा केली. वास्तविक या असल्या चमकदार घोषणा करण्याऐवजी पंतप्रधानांनी त्यांनीच दिलेलं दरवर्षी दोन कोटी रोजगारांचं वचन प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या एकूण अर्थसंकल्पापैकी १० टक्के रक्कमही शिक्षणावर खर्च होत नाही.

सरकारला शिक्षणाचं खासगीकरण करायचं आहे. हे सर्वसामान्यांना परवडणार नाही. मुलांच्या शाळेची फी, गणवेश, वह्यापुस्तकं आणि इतर गोष्टींमध्येच पालकांचा प्रचंड खर्च होतो. हे सगळं एका बाजूला असताना दुसरीकडे देशात विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. देशात दर तासाला एक विद्यार्थी आज आत्महत्या करत आहे. पण त्याबाबत कोणालाच काहीच पडलेलं नाही, अशी टीकाही कन्हैय्या यांनी केली.

Kanhaiya Kumar in Mumbai
Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण, खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती

देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन,’ असं म्हणत होते. पण केंद्रातल्या नेतृत्वामुळे १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवून स्वत: त्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत असल्याची टीका कन्हैयाकुमार यांनी केली. तसेच भाजपच्या या वॉशिंग मशीनमध्ये कोणतं डिटर्जंट वापरतात की, पक्षात येण्याआधी भ्रष्ट असलेला नेता भाजपमध्ये गेल्यानंतर अचानक पवित्र होतो, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com