Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण, खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती

Ajit Pawar infected with dengue : अजित पवार दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसत नव्हते.
Ajit Pawar
Ajit Pawar saam tv
Published On

Mumbai News :

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यता आली आहे. याचा फटका राज्याची उपमुख्यमंत्र अजित पवार यांनाही बसला आहे.

अजित पवार दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसत नव्हते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit Pawar
Maratha Reservation: मराठा आरक्षण आणखी लांबणीवर? पुरावे सादर करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

अजित पवारांना डेंग्यूची लागण, पुढील काही दिवस आराम करण्याचा डॅाक्टरांनी सल्ला दिल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करत दिली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अजित पवार पुन्हा कामाला सुरुवात करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Ajit Pawar
Viral Video : बेडवर झोपलेल्या रुग्णाला डॉक्टरची शिवीगाळ करत मारहाण, कारणही तितकच धक्कादायक

प्रफुल्ल पटेल यांनी काय ट्वीट केले?

अजित पवार यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील अनुपस्थितीबाबत प्रसारमाध्यमांमध्ये विविध बातम्या दिल्या जात आहेत. याबाबत मी स्पष्ट करतो की कालपासून अजित पवार यांना डेंग्यूचे निदान झाले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मदत आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. पूर्णपणे बरे झाल्यानंतर ते पुन्हा सार्वजनिक कर्तव्ये सुरु ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील, अशी पोस्ट प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com