Kalyan News : बेतुरकर पाड्यातील महिलांचा कल्याण महापालिकेवर हंडा कळशी माेर्चा

Kalyan Dombivli Municipal Corporation : महिलांनी प्रश्न सुटेपर्यंत उपाेषणाचा मार्ग अवलंबला आहे.
Womens Morcha For Regular Water Supply On Kalyan Dombivli Municipal Corporation
Womens Morcha For Regular Water Supply On Kalyan Dombivli Municipal Corporationsaam tv
Published On

- अभिजीत देशमुख

Kalyan News : बेतुरकर पाडा परिसरात सुरळीत पाणी पूरवठा व्हावा या मागणीसाठी आज (साेमवार) महिलांनी कल्याण महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हंडा कळशी माेर्चा काढला आहे. यावेळी महिलांनी महापालिकानजीक उपोषण देखील सुरू केले आहे. (Maharashtra News)

Womens Morcha For Regular Water Supply On Kalyan Dombivli Municipal Corporation
Whatsapp वर बीडच्या घटनांचे व्हिडिओ पाठवा, तुमचे नाव गुपित ठेवले जाईल : पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर

कल्याण मधील बेतुरकर पाडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्या तीव्र बनली आहे. सातत्याने कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

गेल्या 40 वर्षांपासून या ठिकाणच्या पाईपलाईन बदलण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही समस्या भेडसावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आम्ही पाण्याच्या समस्येबाबत अनेकदा आंदोलने केली, प्रशासनास निवेदने दिले परंतु महापालिकेने कायमच आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे महिलांनी सांगितले.

दरम्यान आज सामाजिक कार्यकर्ते राणी कपोते यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिलांनी महापालिका मुख्यालयावर माेर्चा काढला. यावेळी महिलांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हंडा कळश्यांसमवेत महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच उपोषण सुरू केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जोपर्यंत पाणी समस्येबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे महिला आंदाेलकांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Womens Morcha For Regular Water Supply On Kalyan Dombivli Municipal Corporation
Kalicharan Maharaj : धाराशिव लोकसभा निवडणूक लढवणार ? राजकारणातील प्रवेशाबाबत कालीचरण महाराज स्पष्टच बाेलले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com