Gulabrao Patil: ग्राउंड लेव्हलवर काम व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे शिंदे गटाला यश; मंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यात शिंदे गटाला चांगले यश मिळाले आहे
Gulabrao Patil
Gulabrao PatilSaam tv
Published On

जळगाव : जळगाव जिल्ह्यासह राज्यात ग्रामपंचायतीवर शिंदे गट व भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या (Jalgaon) असून ग्राउंड लेव्हलवर केलेले काम व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच शिंदे गटाला यश मिळाले आहे. काम करणाऱ्यांच्या मागे मतदार उभा राहतो हे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झाल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केले. (Live Marathi News)

Gulabrao Patil
Grampanchayat Election Result: नंदुरबार जिल्ह्याच्या ९ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा; राष्ट्रवादी, काँग्रेसला एकही जागा नाही

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीचा (Grampanchayat) निकाल हाती आला आहे. यात शिंदे गटाला चांगले यश मिळाले आहे. शिवाय जळगाव जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, धरणगाव तालुक्यात शिंदे गटाने जोरदार बाजी मारली आहे. यावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gulabrao Patil
Kalyan News : मुलीचा मृत्यू, नातेवाईकांनी मुलाला काळे फासत दिला चोप; मुलीशी जबरदस्तीने लग्न लावल्याचा आरोप

बोदवडमध्ये अपेक्षित यश नाही 

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील एकही ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाला खाते उघडता आले नाही. येथे ग्रामपंचायतीची संख्या कमी असल्याने त्या ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नसल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

जळगाव जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल 

एकूण ग्रामपंचायत - १६७

शिंदे गट - ३५
भाजप - ३५

शरद पवार गट - ७

अजित पवार गट - ५
उद्धव ठाकरे गट - ५
काँग्रेस - २
इतर - १०

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com