Monsoon Snacks SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Snacks : थंडगार पावसात बनवा भाज्यांपासून चटपटीत भजी, जाणून घ्या रेसिपी..

Monsoon Snacks Recipes : या पावसात साध्या, सोप्या पद्धतीने बनवा भाज्यांपासून चटपटीत भजी. रेसिपी जाणून घ्या..

Shreya Maskar

पाऊस म्हटला की चटपटीत खाणे आले. ओल्याचिंब पावसात गरमागरम चहा आणि सोबत खमंग चटपटीत भजींचा आस्वाद घेणे हे सुख अनुभवायला आपण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. पावसात चटपटीत खाणे आनंदासोबतच आजारांचे आमंत्रणही देते. यासाठी पावसात बाहेरील पदार्थ खाणे टाळा आणि घरीच खमंग पदार्थ बनवा. पावसात कांदाभजी आणि गरमागरम चहा हे भन्नाट कॉम्बिनेशन सर्वांना खूप आवडत. पण चहासोबत अजून एखादी भजीची व्हरायटी चाखायला मिळाली तर 'सोने पे सुहागा' म्हणायला काहीच हरकत नाही.

चला तर मग अनेकांना न आवडणाऱ्या भांज्यापासून स्वादिष्ट भजी बनवूया. साधी सोपी घरगुती रेसिपी जाणून घ्या..

फ्लॉवरचे भजी

सर्वप्रथम फ्लॉवर पाणी टाकून छान वाफवून घ्यावा. त्यानंतर एका भांड्यात मैदा, आले-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, कॉर्नफ्लोवर आणि वाफवलेला फ्लॉवर छान मिक्स करून त्यांचे भजी तळून घ्यावे. भजींची चव आणखी वाढवण्यासाठी तुम्ही सोया सॉस, चिली पावडर, टोमॅटो प्यूरी घालून एक चटपटीत चटणी बनवू शकता. या चटणीला कोथिंबीर घालून सजवा आणि फ्लॉवर भजीचा आस्वाद घ्या.

क्रिस्पी क्रंची भेंडी भजी

भेंडी स्वच्छ धुवून उभी कापून घ्या. त्यानंतर एका भांड्यात आले-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, कॉर्नफ्लोवर घालून छान एकत्र करा. या मिश्रणात कापलेली भेंडी घोळवून तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत भेंडी छान तळून घ्या. केचप किंवा तिखट चटणीसोबत तुम्ही या क्रंची भेंडी भजींचा आस्वाद घेऊ शकता.

वांग्याचे भजी

सर्वप्रथम वांग्याचे साल काढून वांगी गोल पातळ कापून घ्या. कापलेली वांगी काळी पडू नये म्हणून त्यांना पाण्यामध्ये ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोवर , तिखट, मीठ, आले-लसूण पेस्ट घालून छान मिश्रण करावे. या मिश्रणात वांग्याची कापे घोळवून गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यावी. कोथिंबीर-मिरचीच्या हिरव्या चटणीसोबत या स्वादिष्ट भजींचा आस्वाद घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : बेल्ट, बॅट, दांडक्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण हॉस्टेलमध्ये भयंकर प्रकार, मारहाणीचे Video समोर

Diwali Fort Making : दिवाळीत बच्चे कंपनीसोबत बनवा भव्य किल्ला, 'अशी' करा सजावट

IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीची मोजणी करण्यासाठी स्कायमेट कुठून शेतकऱ्यांची दिशाभूल

Diwali Car Offers: दिवाळी धमाका! मारुती कंपनीच्या 'या' कारवर तब्बल 2 लाखांपर्यंतची सूट

SCROLL FOR NEXT