Mango Bhaji Recipe : आणि आंब्याचा पण मोये मोये झाला; उकळत्या तेलात तळली कुरकुरीत मँगो भजी, VIDEO व्हायरल

Mango Bhajis Recipe Video Viral : आंब्यापासून बनवले जाणारे अनेक पदार्थ तुम्ही आजवर खाल्ले असतील. मात्र आता सोशल मीडियावर आंब्यापासून बनलेला एक वेगळाच पदार्थ व्हायरल झाला आहे.
Mango Bhajis Recipe Video Viral
Mango Bhaji RecipeSaam TV

सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा सर्वजण चाखतात. वर्षातून एकदाच येणाऱ्या या फळाचे अनेक प्रेमी आहेत. आंबा खण्याबरोबर काही व्यक्ती मँगो ज्यूस, मँगो मस्तानी, आंबावडी अशा विविध पदार्थांवर ताव मारतात. आंब्यापासून बनवले जाणारे अनेक पदार्थ तुम्ही आजवर खाल्ले असतील. मात्र आता सोशल मीडियावर आंब्यापासून बनलेला एक वेगळाच पदार्थ व्हायरल झाला आहे.

Mango Bhajis Recipe Video Viral
Grandfather Dance Video: नाद ओ बाकी काय नाय! ढोलकीचा आवाज कानी पडताच आजोबांनी धरला लावाणीवर ठेका; VIRAL VIDEO

आंबा भजी

काही फळांचे भजी बनवले जातात. यामध्ये केळीपासून बनवलेले भजी, बटाटा आणि कांदा भजी तुम्ही खाल्लेच असतील. मात्र तुम्ही कधी आंबा भजी खाल्ले आहेत का? आंब्याचे सिजन सुरू असल्याने सध्या काही ठिकाणी आंब्याचे देखील भजी बनवले जात असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर या आंबा भजीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीचं भजीचं दुकान आहे. येथे तो आपले गरमागरम भजी विकत आहे.

भजी बनवण्यासाठी त्याने एका बाजूला कढईत तेल तपण्यसाठी ठेवलं आहे. तर दुसरीकडे मोठ्या किसनीवर तो आंबे किसून घेत आहे. बटाटा भजी बनवताना जसे पातळ काप केले जातात त्या पद्धतीने या व्यक्तीने आंबा किसून घेतला आहे. त्यानंतर बेसन पिठात मीठ, तिखट टाकून छान मिश्रण करून घेतलं आहे. या मिश्रणात आंब्याचा एक एक स्लाइस बुडवून त्याने तेलात सोडलाय. मस्त उकळत्या तेलात सर्व भजी तळून घेतले आहेत.

आंब्याचे भजी खाण्यासाठी या दुकानाबाहेर मोठी गर्दी देखील जमा झाली आहे. लोकांना ही युनिक आणि हटके कॉन्सेप्ट फार आवडली आहे. @chetanafood या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आम्ही सिद्ध आंब्याचे भजी बनवून ट्राय करून बघणार असं काहीनी कमेंटमध्ये लिहिलं आहे. तर काहींनी या विक्रेत्याची मस्करी करत फनी कमेंट केल्या आहेत. आंब्याचा सुद्धा मोये मोये झाला असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही. या आधी चक्क अंडा भजी, भेंडी, वांगी, टोमॅटो असे भजी बनवल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. एकाच पदार्थात काही तरी वेगळेपण आणायचं म्हणून काही व्यक्ती अगदीच अतरंगी रेसिपी देखील बनवतात. एका महिलेने गुलाबाच्या फुलांचे देखील भजी बनवल्याचा व्हिडिओ या आधी व्हायरल झाला होता.

Mango Bhajis Recipe Video Viral
Viral Video : पंचवटी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बुद्ध पौर्णिमेचा जल्लोष; कोचमध्ये निळ्या अन् पंचशील ध्वजाची सजावट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com