Viral Video : पंचवटी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बुद्ध पौर्णिमेचा जल्लोष; कोचमध्ये निळ्या अन् पंचशील ध्वजाची सजावट

Buddha Purnima Viral Video : नागरिकांनी पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी केली आहे. यासाठी संपूर्ण ट्रेनमध्ये निळ्या तसेच पंचशील ध्वजाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Viral Video
Viral Video Saam TV
Published On

भारतात प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. काल संपूर्ण भारतभर बुद्ध पौर्णिमा मोठ्या दिमाखात साजरी झाली. घराघरात आणि चौका चौकात रांगोळ्या, पंचशील ध्वजाची आकर्षक सजावट पाहायला मिळाली. अशातच पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
Police Viral Video: एम्स रुग्णालयात सहाव्या मजल्यावर पोलिसांनी नेली कार; महिला डॉक्टरला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नागरिकांनी पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी केली आहे. यासाठी संपूर्ण ट्रेनमध्ये निळ्या तसेच पंचशील ध्वजाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. येथील बुद्ध अनुयायांनी संपूर्ण ट्रेनमध्ये ही सजावट केली आहे. या आनंदाचा क्षण अनेकांनी आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

@bhimkanya.tejas या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. भारतीय नागरिक तसेच लाखो बुद्ध अनुयायांनी यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहिलं आहे. बुद्ध पौर्णिमा साजरी करताना बुद्धांचे विचार देखील अंगीकारले पाहिजेत, असंही काहींनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने एक सुंदर सल्ला देखील दिला आहे.

ट्रेनमध्ये सजावट केलेल्या व्यक्तींनी पुन्हा परतताना सर्व निळे आणि पंचशील ध्वज काढून घ्यावेत. कारण नंतर बाहेर हे ध्वज खाली पडल्यावर कुणाच्याही पायाखाली येण्याची शक्यता असते. ट्रेनमध्ये सण उत्सव साजरे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील ट्रेनमध्ये विविध सण आणि उत्सव साजरे झाले आहेत.

ट्रेनने अनेक चाकरमानी दररोज प्रवास करतात. प्रवासात आपली संस्कृती आणि सण उत्सव कुटुंबीयांसह साजरे करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे असे प्रवासी ट्रेनमध्येच आपला आनंद साजरा करतात. मुंबई लोकल ट्रेनमध्ये तर दिवाळी, दसरा यासह नवरात्रीचा गरबा खेळल्याचे व्हिडिओ देखील याआधी व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

Viral Video
Dombivli MIDC Fire: भीषण आग, स्फोटांवर स्फोट आणि नागरिकांची पळापळ; डोंबिवली MIDC मधील स्फोट आणि आगीनंतरच्या भयावह परिस्थितीचे VIDEO बघा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com