Grandfather Dance Video: नाद ओ बाकी काय नाय! ढोलकीचा आवाज कानी पडताच आजोबांनी धरला लावाणीवर ठेका; VIRAL VIDEO

Grandfather Dance Viral Video: महाराष्ट्राला खूप मोठी लोकपरंपरा लाभली आहे. महाराष्ट्राची लावणी ही देशभर प्रसिद्ध आहे. याच लावणीवर एका आजोबांनी ठेका धरला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Grandfather Dance Video
Grandfather Dance VideoSaam Tv

महाराष्ट्राला खूप मोठी लोकपरंपरा लाभली आहे. महाराष्ट्राची लावणी ही देशभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात प्रत्येक सणसमारंभात, जत्रेत लावणी सादर केली जाते. लावणी ही असा नृत्यप्रकार आहे की जो सर्व प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडते. असाच लावणीवर एका आजोबांनी ताल धरला आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक आजोबा लावणीवर ताल धरताना दिसत आहे. व्हिडिओत एका गावात लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याचे दिसत आहे. हा लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली आहे. समोर स्टेजवर दोन नृत्यांगणा लावणी सादर करत आहेत. ही लावणी सुरु होताच प्रेक्षकांमधून एक आजोबा उठतात आणि नाचायला सुरुवात करतात.

या आजोबांनी कशाचीही लाज न बाळगता लावणीवर ताल धरायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. हे आजोबा लावणीची प्रत्येक स्टेप उत्तरित्या करताना दिसत आहे. आजोबांचा हा उत्साह प्रत्येक तरुणाला लाजवेल, असा आहे. जुनी लोक त्यांच्या परंपरेला अजूनही जगत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हिडिओतील आजोबा आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Grandfather Dance Video
Delhi Metro: पुन्हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल; लेडीज कोचमध्ये मुलीचा अश्लील डान्स Watch video

charchatarhonar या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बाबा जोमात पब्लिक कोमात असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओवर वय हा फक्त आकडा आहे, नाद ओ बाकी काय नाय, अशा कमेंट्स आल्या आहेत.

Grandfather Dance Video
Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com