Lavani Maharashtrachi: ढोलकीची थाप आणि ऐकू येणार घुंगराचा चाळ; ‘लावणी महाराष्ट्राची’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

New Marathi TV Serial: “ढोलकीची थाप आणि तुणतुण्यासोबत झंकारणार घुंगराचे चाळ…” असं म्हणत ‘सन मराठी’ वाहिनी पुन्हा एकदा जिवंत करणार महाराष्ट्राच्या लावणीचा सुवर्णकाळ.
Lavani Maharashtrachi New Marathi TV Serial
Lavani Maharashtrachi New Marathi TV SerialSaam Tv
Published On

Lavani Maharashtrachi New Marathi TV Serial:

आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख लोकनृत्य म्हणजे ‘लावणी’. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. लावणी नृत्य सादर करणं किंवा ते शिकणं ही पण एक कलाच आहे. लावणीच्या कार्यक्रमांना अजूनही तितकाच उदंड प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळतोय. लावणी हे नृत्य लोकप्रिय आहेच, मात्र दिवसेंदिवस त्यात आणखी प्रेक्षांची भर पडत आहे, याला महाराष्ट्रात आधीपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या महाराष्ट्राची कला जपणं हे प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकांचं कर्तव्य आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. लावणी ही लोककला जपण्यासाठी ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी वाहिनीने देखील पुढाकार घेतला आहे. “ढोलकीची थाप आणि तुणतुण्यासोबत झंकारणार घुंगराचे चाळ…” असं म्हणत ‘सन मराठी’ वाहिनी पुन्हा एकदा जिवंत करणार महाराष्ट्राच्या लावणीचा सुवर्णकाळ. ‘लावणी महाराष्ट्राची’ हा नवीन मनोरंजक कार्यक्रम येत्या २५ फेब्रुवारीपासून दर रविवारी रात्री ९ वाजता सन मराठीवर सुरु होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lavani Maharashtrachi New Marathi TV Serial
Mugdha Vaishampayan आणि Prathamesh Laghateचं पोस्ट व्हेडिंग शूट, क्युट VIDEO ची चर्चा

नुकतीच, ‘लावणी महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाची झलक सोशल मिडीयावर दाखवण्यात आली. या कार्यक्रमात मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आणि कलागुण संपन्न अशा अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे, सोनाली कुलकर्णी, स्नेहलता वसईकर, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी यांच्या सुरेख सादरीकरणामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहेत.  (Latest Marathi News)

प्रेक्षक आणि कार्यक्रम यांना जोडून ठेवण्याचं काम निवेदक सुद्धा करत असतो तर या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची जबाबदारी अभिनेते दिगंबर नाईक पेलणार आहेत.

Lavani Maharashtrachi New Marathi TV Serial
Gharoghari Matichya Chuli: रेश्मा शिंदेची 'घरोघरी मातीच्या चुली'ची चर्चा, २० वर्षे जुन्या हिंदी मालिकेचा आहे रिमेक

लावणी नृत्याच्या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक संगीतकार, कवी, आणि कलाकारांनी लावणीच्या क्षेत्रात कामं केले आहेत. त्यांची कला आणि संगीत परंपरा महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक विरासतीचा अमूल्य भाग आहे. यातच आता लावणी हा प्रकार जीवनात ठेवण्यासाठी सन मराठीने हा नवीन कार्यक्रम आणला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com